तोरणाळे येथे लोकसभा निवडणूक 2024 अंतर्गत विशेष SVEEP अभियान राबविण्यात आली…
जामनेर प्रतिनिधी -संजय जटाळे
जामनेर तालुक्यातील तोरणाळे येथे आज दि. 30 रोजी तोरनाळे या गावात हायस्कूल व जि.प.प्रा.शाळा यांच्या मार्फत मतदान जन जागृती साठी गावात फेरी काढण्यात आली ; यावेळी भारत निवडणूक आयोग यांच्या मार्फत सुरु झालेली व्यापक मोहिम यांची माहिती गावकऱ्यांना देण्यात आली ; मतदान हे प्रत्येक मतदाराचा अधिकार आहे आणि तो प्रत्येकाने बजावलाच पाहिजे याचे महत्त्व पटवून देण्यात आले . शासन धोरणानुसार मतदान जनजागृती कालावधी 30 रोजी पथनाट्य वर्ग 8 वी ते 9 वी च्या विद्यार्थ्यांनी सादर केले.तसेच तोरणाळे येथील बी.एल.ओ. 318 व 319 जि. प. प्रा. शाळेचे सांडू तडवी सर, आणि का.आ.विद्यालयाचे एस. टी. वरखड सर,सहाय्यक शिक्षक विहार पाटील सर, ए. के पटेल सर, अतुल नानोटे सर यांनी मतदानाचे महत्त्व पटवून सांगितले.
13 मे रोजी मतदान होणार असून सर्वांनी कोणत्याही आमिषाला, भुलथाफाना बळी न पडता जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशात मतदानाचे आपले कर्तव्य पार पाडा. असे आवाहन नागरिकांना केले. तसेच जण जागृती करत असताना उपक्रमात गावातील पोलीस पाटील, सरपंच, प्रतिष्ठित नागरिक तसेच महिला, तरुण मंडळी बहू संख्येने उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती पर कविता, पथनाटय सादर करण्यात आले.यावेळी गावातील नागरिकानी प्रत्येक चौकामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद दिला.