वाळू प्रकरणी ९ पोलीस कर्मचारी कंट्रोल जमा…

जळगाव – काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया काही कर्मचाऱ्यांचे वाळू व्यावसायिकांशी हितसबंध असल्याबाबत सोशल मीडियावर यादी व्हायरल झाली होती.त्या कर्मचाऱ्यांचे वाळू व्यावसायिकांशी आर्थिक हितसबंध असल्याचा आरोप झालेल्या नऊ पोलिस कर्मचाऱ्यांच्या चौकशीसाठी त्यांची तात्पुरत्या स्वरुपात मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. यामध्ये जळगावातील पाच पोलिस ठाण्यांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी मंगळवारी 21 रोजी काढले.
काही पोलिस कर्मचाऱ्यांचे वाळू व्यावसायिकांशी हितसंबंध असल्याचा आरोप होण्यासह तशी यादीच सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्याची पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी गंभीर दखल घेतली. त्यानुसार जळगाव उपविभागातील एमआयडीसी, तालुका, शनिपेठ, रामानंद नगर, जिल्हापेठ, एलसीबी व शहर पोलिस ठाणे अशा विविध पोलिस ठाण्यातील नऊ जणांच्या चौकशीसाठी त्यांची तात्पुरत्या स्वरुपात मुख्यालयात बदली केली आहे. या उचलबांगडी झाल्यामुळे पोलिस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे.
ईतर महत्वाच्या बातम्या
TDS प्रकरणी इन्कम टॅक्स पथकाची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासणी..