रावेर-पुनखेडा रस्त्याची दुरावस्था : वाहनधारक त्रस्त..
रावेर (प्रतिनिधी) – हमीद तडवी
रावेर-पुनखेडा हा रस्ता अडीच ते तीन किमीचा असून या रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे, तसेच रस्त्याने ये-जा करणारे वाहनधारकाना वाहने चालवताना कमालीची कसरत करावी लागत आहे.
सविस्तर वृत्त असे की येथून जवळ असलेल्या रावेर-पुनखेडा जवळ जवळ अडीच ते तीन किमी अंतराचा रस्ता असून या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले असल्याचे चित्र आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी लहान-मोठे खड्डे पडल्याने दिवसा तसेच रात्रीही वाहनधारकांना वाहने चालवताना कमालीची कसरत करावी लागते. ही रस्त्याची झालेली दुरावस्था तसेच वाहन धारकांचे होणारे हाल शासन,प्रशासन लक्ष देऊन थांबवतील का,असा प्रश्न वाहनधारक आणि परिसरातील नागरिकांना पडलेला आहे.
हा भाग केळी उत्पादकांचा असल्याने केळी भरण्यासाठी ये-जा करणारी वाहने,शेतकरी आणि शेतमजूर व स्कूल बस इतर ये-जा नागरिकांची दिवसभर या रस्त्यावरून वर्दळ सुरूच असते.
रस्ता खराब झाला असल्याने या रस्त्यावर छोटे-मोठे अपघात नेहमीच होत अअसल्याचे समजते. शासन प्रशासन यांनी लक्ष देऊन रस्ता दुरुस्तीची मागणी वाहनधारक तसेच परिसरातील नागरिकांमधून होत आहे.
ईतर महत्वाच्या बातम्या
एसटी वाहकाने सुटे पैसे नसल्याने युवतीला अंधारात बसमधून उतरवले !