जळगाव

तापी पाटबंधारे विकास महामंडळमधील भ्रष्टाचाराविरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार युवक काँग्रेस चे आंदोलन

भ्रष्ट अभियंत्यांच्या प्रतीकात्मक खुर्चीला पुष्पहार अर्पण करून घोषणांचा निनाद..

जळगांव – तापी पाटबंधारे विकास महामंडळ,जळगाव मध्ये शेततळे व इतर कामांत कोट्यवधी रुपयांचा गैरप्रकार करणाऱ्या कार्यकारी अभियंता गोकुळ श्रावण महाजन व त्यांच्या सहकाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून “भ्रष्टाचांऱ्याचा सन्मान..हाच अधिकांऱ्याचा मान” हे अभिनव आंदोलन करण्यात आले.

अधिक्षक अभियंता,जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळ यांच्या कार्यालयाबाहेर ” होऊ द्या‌ दाखल गुन्हा.. आम्ही भ्रष्टाचार करू पुन्हा” असे घोषवाक्य लिहलेल्या अभियंत्यांच्या प्रतीकात्मक खुर्चीला पुष्पहार अर्पण उदबत्ती लावण्यात आली. शेततळे कामात गैरप्रकार करणाऱ्या अभियंत्याला निलंबित करा, न्याय द्या न्याय द्या खुर्चीला न्याय द्या, होउ.द्या दाखल गुन्हा भ्रष्टाचार करू पुन्हा अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. अचानक झालेल्या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधले गेले. शेततळे कामामध्ये गैरप्रकार करणारे कार्यकारी अभियंता गोकुळ महाजन यांच्यावर एका प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाने आदेश देवूनही त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याने आंदोलनकर्त्यांनी येत्या सात दिवसात कारवाई न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.

यावेळी जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळ येथील अधिक्षक अभियंता भदाणे यांच्या वतीने कार्यालय अधिक्षक यांना भ्रष्ट अधिकाऱ्यांना असेच पाठबळ देत रहा असे सांगून पुष्पगुच्छ देऊन निवेदन देण्यात आले.

आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष रिकू‌ उमाकांत चौधरी,सुनील माळी,डॉ.संग्राम सुर्यवंशी,किरण राजपूत,चेतन पवार,आकाश हिवाळे,हितेश जावळे,योगेश साळी,सचिन साळुंखे,विनोद ढमाले, भल्ला तडवी,शैलेश अभंगे, खलील शेख, मतीन सैय्यद,ललित चौधरी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

ईतर महत्वाच्या बातम्या 

वाघाच्या कातडीची तस्करी करणारी टोळी जेरबंद..

जळगांव येथे वनविभागा तर्फे जागतिक व्याघ्र दिना निमित्त जनजागृती कार्यक्रम…

 

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे