मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या मतदार संघ निहाय अशासकीय सदस्यांची समिती जाहीर…
नंदुरबार (जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी) : ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे’ पात्र लाभार्थी उमेदवार ठरविण्यात करिता विधानसभा मतदार संघ निहाय अशासकीय समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. या समिती सदस्यांच्या नावांची यादी पालक मंत्री अनिल पाटील यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे नुकतीच सुपूर्द केली. तीन सदस्यीय समितीद्वारे जिल्ह्यातील पत्र लाभार्थी उमेदवारांची यादी निश्चित करण्यासाठी आलेल्या अर्जांची छाननी करण्यात येण्याची शक्यता आहे. संपूर्ण राज्यात गाजावाजा होत असलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत’ दर दिवशी शासनाच्या वतीने आवश्यकतेनुसार काही ना काही बदल करण्यात येत आहे. याच अनुषंगाने मागील आठवड्यात मतदार संघ निहाय अशासकीय समित्या गठीत करुन तालुकानिहाय पात्र लाभार्थी उमेदवार ठरविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले होते. त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यात विधानसभा मतदार संघ निहाय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अशासकीय समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. त्याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी श्रीमती मनीषा खात्री यांना मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल पाटील यांच्याकडून देण्यात आले आहे. नंदुरबार जिल्ह्यात चार विधानसभा मतदार संघ आहेत. या चारही मतदार संघांवर अशासकीय समितीवर अध्यक्ष व सदस्यांची नावे देण्यात आले आहेत. मतदार संघनिहाय समिती सदस्य असे, नंदुरबार मतदार संघ- मंत्री डॉ. विजयकुमार गावित (अध्यक्ष), विक्रमसिंग जालमसिंग वळवी (सदस्य) व उमेश गौतमचंद जैन (सदस्य), शहादा-तळोदा मतदार संघ– आमदार राजेश पाडवी (अध्यक्ष), डॉ राजेंद्र धनाजी पेंढारकर (सदस्य) व माधवराव पंडित पाटील (सदस्य), अक्कलकुवा धडगाव मतदार संघ– आमदार आमश्या पाडवी (अध्यक्ष), सुभाष शंकर पावरा (सदस्य ) व रतन खत्र्या पाडवी (सदस्य), नवापूर मतदार संघ– भरत माणिक गावित (अध्यक्ष), बकाराम फत्तेसिंग गावित (सदस्य) व प्रवण विवेक सोनार (सदस्य).