गुन्हेगारीजळगाव जिल्हा

1 लाखाची लाच ,ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह कंत्राटी सेवक एसीबी च्या जाळ्यात..

पारोळा : तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात 1 लाख रूपयांची लाच घेणाऱ्या पारोळा पंचायत समिती कार्यालयातील ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह कंत्राटी सेवकाला जळगाव लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे.

तक्रारदार हे सरपंच यांचा मुलगा असून त्यांच्या गावातील ग्रामपंचायत येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत काँक्रेट व पेव्हर ब्लॉक अशा एकूण चार कामांच्या प्रत्येकी १५ लाख रुपये प्रमाणे ६० लाखांचे काम शासनाकडून मंजूर होऊन आलेले होते. कामाची वर्कऑर्डर काढण्यासाठी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी कल्पेश ज्ञानेश्वर बेलदार यांनी ग्रामविस्तार अधिकारी सुनील अमृत पाटील यांच्यासाठी २ टक्के प्रमाणे व स्वतःसाठी १ टक्के प्रमाणे १ लाख ८० हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती.

त्याबाबत तक्रारदारांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे १० सप्टेंबर रोजी तक्रार दिली होती. तक्रारीची पडताळणी केली असता ग्रामविस्तार अधिकारी सुनील पाटील यांनी प्रोत्साहन देऊन कल्पेश बेलदार यांनी पंचांसमक्ष तडजोडीअंती १ लाख रुपये बीडिओसाठी लाचेची मागणी करून १ लाख रुपये लाच स्वीकारताना त्यांना दि. २० रोजी रंगेहात पकडण्यात आले आहे.त्यांच्यावर पारोळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव, स्मिता नवघरे, हेडकॉन्स्टेबल सुनील वानखेडे, किशोर महाजन, बाळू मराठे, हेडकॉन्स्टेबल सुरेश पाटील, रवींद्र घुगे, महिला हेडकॉन्स्टेबल शैला धनगर, प्रदीप पोळ, प्रणेश ठाकूर, सचिन चाटे यांनी कारवाई केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे