रावेर

श्री व्ही.एस.नाईक रावेर महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन उत्साहात..

(रावेर तालुका प्रतिनिधी सानिया तडवी) 

श्री विठ्ठलराव शंकरराव नाईक कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावेर येथील ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांसाठी, प्रमोद महाजन कौशल्य आणि उद्योजकता विकास अभियानांतर्गत महाराष्ट्र शासनामार्फत आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचा शुभारंभ दूरदृश्य प्रणाली द्वारे  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे शुभहस्ते आणि महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल डॉ.सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे,  केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे उपस्थितीत दिनांक 20 सप्टेंबर 2024 शुक्रवार रोजी करण्यात आला.

यासाठी श्री विठ्ठलराव शंकरराव नाईक कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय रावेर आणि महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्र जळगाव यांच्यात एम.ओ.यु. करार झालेला आहे.आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रात विद्यार्थ्यांसाठी कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

यावेळी रावेर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष  हेमंतशेठजी नाईक यांचे मार्गदर्शन लाभले. रावेर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मा.प्रा. मुरलीधर सी.कानडे यांचे मार्गदर्शन आणि प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच सर्व संचालक मंडळ यांनी विद्यार्थ्यांना आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राच्या शुभारंभा बाबत शुभेच्छा दिल्या.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल पाटील यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले तसेच नोडल अधिकारी व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था रावेर येथील मा.प्राचार्य मोहन पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी उपप्राचार्य प्रा. एस. डी. धापसे आणि आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे महाविद्यालयीन समन्वयक प्रा. सी.पी.गाढे, रावेर येथील एम्प्लॉयमेंट ऑफिसचे अधिकारी जसपाल सिंग गिरासे,डॉ.एल.सी.नेमाडे प्रा.व्ही.डी.पाटील,डॉ. एस.आर.चौधरी,प्रा.चेतन सुतार, प्रा.एल.एम.वळवी, प्रा.देविदास महाजन यांची उपस्थिती लाभली.या समारोहास महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला व आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र उद्घाटनाच्या ऐतिहासिक सोहळ्याचा आनंद घेतला.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे