अवैधरित्या वाहनांमध्ये घरगुती गॅस भरणारा Lcb च्या ताब्यात..
मोठ्या प्रमाणात घरगुती गॅस सिलेंडरचा साठा जप्त..
जळगाव – जिल्ह्यात बरेचसे वाहनधारक आपल्या वाहनांमध्ये स्वयंपाकाचा गॅसचा सर्रास वापर करतात.यामुळे जळगाव शहरासह, जिल्ह्यात व गावातील गल्लीबोळात अनाधिकृतपणे स्वयंपाकाचा गॅस वाहनात भरुन देण्याच्या व्यवसाय सर्रास सुरू आहे.
शिरसोली येथे एक इसम स्वयंपाकाचा गॅस वाहनात भरुन देत असल्याची गोपनीय माहिती जळगाव स्थानिक गुन्हा शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबनराव आव्हाड यांना मिळाली होती.या मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना सोबत घेत मिळालेल्या
माहितीनुसार शिरसोली येथील मलिक नगर सादिक सिराज पिंजारी याच्या रहाते घरी जाऊन पहाणी केली असता सादिक पिंजारी याच्या घराच्या कंपाऊंड मधील मोकळ्या जागेत मानवी जीवन धोक्यात येईल अगर अन्य कोणत्याही व्यक्तीला दुखापत अगर नुकसान पोहचण्याचा संभव निर्माण होईल अशा पद्धतीने ज्वलनशील अशा भारत गॅस, एच, पी, गॅस, इंडियन गॅस कंपनीचे घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा गाडीत भरण्याच्या उद्देशाने बेकायदेशीरपणे साठा करुन वाहनात भरुन देण्याच्या उद्देशाने मोठया प्रमाणात गॅस सिलेंडर आढळून आले.
म्हणून घरमालक सादिक सिराज पिंजारी याच्या ताब्यातील एच. पी. व इंडियन कंपनीचे असे ऐकून ७३ घरगुती व व्यावसायिक वापराचे सिलिंडर, गॅस वितरणासाठी वापरली जाणारी अॅपे रिक्षा क्रमांक एम. एच. १९, बी. एम. २७८४ तसेच गॅस भरण्यासाठी लागणारे मशीन, वजनकाटा व इतर साहित्य असा एकूण ५,२९,६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संशयित आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात एम. आय. डी. सी. पोलीस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक बबनराव आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रेय पोटे सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलीस हे.कॉ. हरीलाल पाटील, विजय पाटील, प्रदीप चवरे, ईश्वर पाटील यांनी केले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र उगले हे करीत आहेत.
ईतर महत्वाच्या बातम्या
१ हजाराची लाच भोवली, तलाठ्यासह खाजगी पंटर ACB च्या ताब्यात..
१० हजाराची लाच , सरपंचासह खाजगी पंटर ACBच्या जाळ्यात..
सावदा परिसरात अवैध धंदे जुगार अड्डे जोमात, पोलीस प्रशासन कोमात..
1 लाखाची लाच ,ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह कंत्राटी सेवक एसीबी च्या जाळ्यात..