१ हजाराची लाच भोवली, तलाठ्यासह खाजगी पंटर ACB च्या ताब्यात..
पारोळा – तालुक्यातील लोणी बु.गावातील शेत जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर कर्जाचा बोजा चढविण्यासाठी १ हजाराची लाच मागितली. ती लाच मागणीस प्रोत्साहन देऊन लाच रक्कम मिळविण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला म्हणून चोरवड येथील खाजगी पंटर व तलाठी यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव यांनी कारवाई केली असून सुभाष विठ्ठल वाघमारे असे तलाठी यांचे नाव असून शरद प्रल्हाद कोळी, खाजगी इसमाचे नाव आहे.
यातील तक्रारदार यांचे व त्यांच्या कुटुंबियांच्या नावे लोणी बु. ता.पारोळा येथे ६.५ एकर शेत जमीन आहे. सदर शेत जमिनीवर तक्रारदार यांना लोणी बु. गावातील वि. का.सो. लि. सहकारी सोसायटी मधुन कर्ज घेण्यासाठी सदर शेत जमिनीचे ७/१२ उताऱ्यावर बोजा चढविणे आवश्यक होते. त्यामुळे तक्रारदार यांनी लोणी बु. गावाचे तलाठी सुभाष विठ्ठल वाघमारे याची चोरवड येथील कार्यालयात जाऊन भेट घेतली त्यावेळी त्यांनी त्यांच्या वर नमुद कामा संदर्भात तलाठी यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी तलाठी सुभाष विठ्ठल वाघमारे यांनी तक्रारदारास सांगितले की, तुमच्या व कुटुंबियांच्या नावे असलेल्या शेत जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर कर्जाचा बोजा चढविण्याच्या मोबदल्यात ४ उताऱ्याचे प्रत्येकी २००/-प्रमाणे ८००/-रुपये व मागील कामाचे २०० असे ऐकुन १०००/-रुपये द्द्यावे लागतील असे सांगितले.त्यावेळी खाजगी इसम, शरद कोळी याने सदर लाच मागणीस प्रोत्साहन देऊन लाच रक्कम त्यांच्या फोन पे अकाउंट वर टाकण्यास सांगुन लाच रक्कम मिळविण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला म्हणून त्यांच्या विरुद्ध पारोळा पोलीस स्टेशन येथे लाच मागणी बाबत गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर ,पोलीस निरीक्षक, नेत्रा जाधव,स्मिता नवघरे , पीएसआय दिनेशसिंग पाटील,पोहेकॉ,रविंद्र घुगे,सुनिल वानखेडे, पोना बाळू मराठे, पोना. किशोर महाजन ,मापोहेको शैला धनगर, पोकॉ.प्रदिप पोळ पोकॉ.,प्रणेश ठाकुर,पोकॉ.अमोल सुर्यवंशी.
ईतर महत्वाच्या बातम्या
1 लाखाची लाच ,ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह कंत्राटी सेवक एसीबी च्या जाळ्यात..
१० हजाराची लाच , सरपंचासह खाजगी पंटर ACB च्या जाळ्यात..
सावदा परिसरात अवैध धंदे जुगार अड्डे जोमात, पोलीस प्रशासन कोमात..