जळगाव जिल्हा

हरिपूरा आश्रमशाळा येथे वन्यजीव सप्ताह २०२४ च्या निमित्ताने “मानव-वन्यजीव संघर्ष निवारण” तसेच “वने व वन्यजीव”जन जागृती सभेचे आयोजन….

जळगाव – दि.०२ रोजी, हरिपूरा आश्रमशाळा (यावल पश्चिम रेंज) (यावल वन विभाग यावल, जळगाव) येथे वन्यजीव सप्ताह २०२४ च्या निमित्ताने “मानव-वन्यजीव संघर्ष निवारण” तसेच “वने व वन्यजीव” या बाबत यावल पश्चिम रेंज (यावल वन विभाग यावल, जळगाव) व वाईल्ड ल्यॅंड्स कंझर्वेशन फाऊंडेशन नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जन जागृती सभा घेण्यात आली.

यामध्ये यावल पश्चिम वन परिक्षेत्र अधिकारी सुनिल भिलावे यांनी कर्तव्य व जंगलाचे रक्षण करताना आलेले अनुभव सांगितले तसेच वाघ व कॅमेरा ट्रॅप ची माहिती दिली. यावेळेस वाईल्ड ल्यॅंड्स कंझर्वेशन फाऊंडेशन चे संस्थापक अजिंक्य भांबुरकर यांनी वन्यजीव सप्ताह कधी सुरू करण्यात आला व त्याचे उद्देश कायव मानव-वन्यजीव संघर्ष म्हणजे काय?, गाव व जंगल ची भौगोलिक स्थिती कशी आहे, जंगल कस कमी होत चालले आहे, आपण जंगलावर कसे निरभर आहोत, वाघ-बिबट च्या हालचाली व सवई काय आहेत, कुठल्या स्थिती मध्ये वाघ-बिबट मानवावर हल्ला करतो व मानव-वन्यजीव संघर्ष होऊ नये यासाठी चे उपाय सांगण्यात आले.

१) नाले, पाणवठे, ठंडावाच्या ठिकाणी जाण्यास टाळावे

२) ज्या ठिकाणी वाघ-बिबट चे ठसे आढले त्या ठिकाणी जाण्यास टाळावे

३) अचानक पणे वाघ-बिबट समोर आल्यास त्या कडे पाठ न करता

४) हळूहळू मागे सरकून सुरक्षित अंतर ठेवावे

५) वाघ-बिबट शेतात गाव परिसरात आढळून आल्यास त्याचा पाठलाग करू नका व घेरू नका

आज जर मानव-वन्यजीव संघर्ष टाळायचा असेल तर विद्यार्थी, शिक्षक व स्थानिक लोकांचा सहभाग अत्यावश्यक आहे व सहजीवन अवलंबले तर हा संघर्ष सहज टाळता येईल.

वरील वन्यजीव सप्ताह २०२४ जनजागृतीचा कार्यक्रम उपवनसंरक्षक जमिर शेख (भा.व.से) ( यावल वन विभाग, जळगाव),  सहाय्यक वनसंरक्षक समाधान पाटील (मा.व.से) ( यावल वन विभाग, जळगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. तसेच आश्रम शाळा हरीपुरा मुख्याध्यापक साईदाथ पवार,वर्ग शिक्षक व विद्यार्थी,वनपाल हरीपुरा संजय इंडे, वनपाल जामन्या दिपक परदेशी, वनरक्षक अशरफ तडवी, सुधीर पटणे, योगेश सोनवणे, अक्षय रोकडे, योगेश मुंडे, रवीकांत नगराळे, दिपक चव्हाण, विलास तडवी उपस्थित होते.

ईतर महत्वाच्या बातम्या

१ हजाराची लाच भोवली, तलाठ्यासह खाजगी पंटर ACB च्या ताब्यात..

जिल्ह्यात इफको लि. मार्फत १२ तालुक्यात फवारणी करिता किसान ड्रोन उपलब्ध.. 

अवैधरित्या वाहनांमध्ये घरगुती गॅस भरणारा Lcb च्या ताब्यात..

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे