यावल

कु. समृद्धी जगताप एस्पायरिंग यंग सायंटिस्ट अवार्ड २०२५ ने सन्मानित..

पद्मभूषण ज्येष्ठराज जोशी यांच्या हस्ते मुंबई येथे पुरस्काराचे वितरण.

यावल दि.२९ ( सुरेश पाटील ) – डॉक्टर होमी बाबा फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने दिला जाणारा सन २०२४-२०२५ या वर्षीचा एस्पायरिंग यंग सायंटिस्ट अवार्ड २०२५ यावर्षी रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल,जळगांवची विद्यार्थिनी कु.समृद्धी सचिन जगताप हिने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवल्याने देण्यात आला. मुंबई येथील डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात सोमवार दि. २१ एप्रिल २०२५ रोजी the aspiring young scientist award 2025 ( द एस्पायरिंग यंग सायंटिस्ट अवार्ड २०२५ ) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून पद्मभूषण पुरस्कार प्राप्त तसेच आय सी टी मुंबई, भुवनेश्वर, जालनाचे चान्स लर जयेश भालचंद्र जोशी,शास्त्रज्ञ, होमीभाभा संशोधन केंद्राचे सर्व मान्यवर उपस्थित होते. या वेळी पद्मभूषण पुरस्कारीत जोशी यांच्या हस्ते कु.समृद्धी सचिन जगताप हिला अल्फा एस्पायरिंग यंग सायंटिस्ट अवार्ड २०२५ हा पुरस्कार देऊन तिला सन्मानित करण्यात आले आहे.विशेष म्हणजे डॉ. होमीभाभा फाउंडेशन च्या वतीने सन २४-२५ या वर्षी घेण्यात आलेल्या विज्ञान होमी बाबा फाउंडेशन, नवी दिल्ली द्वारे राष्ट्रीय स्तरावर. सत्र २०२४- २५मध्ये भारतातून सुमारे ५ लाख ५० हजार विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १ लाख ७२ हजार विद्यार्थी महाराष्ट्रातील दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरले आहेत. यापैकी केवळ १३ हजार विद्यार्थी तिसऱ्या फेरीसाठी पात्र ठरले. त्यातुन केवळ २० विद्यार्थी इस्रो यात्रेसाठी पात्र ठरले होते. यामध्ये समृद्धी सचिन जगताप ही वर्ग पाचवी मधून महाराष्ट्रातून प्रथम आलेली होती.समृद्धीने या पुरस्कार सोहळ्या प्रसंगी आपल्या पुरस्काराचे सर्व श्रेय तिचे माता-पिता तसेच रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल, जळगांव चे प्रिन्सिपल श्री. विराफ पेसुना, व्हॉइस प्रिन्सिपल, शिरीन चांडक मॅम व इतर सर्व शिक्षिका- शिक्षक यांना दिले.

सदर कार्यक्रमात महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी व शिक्षक यांची उपस्थिती होती. तर फाउंडेशनच्या वतीने दि.२२ एप्रिल रोजी त्यांना इस्रो स्पेस रिसर्च सेंटरला भेटी करिता नेण्यात येऊन समृद्धी ही नुकतीच इसरो स्पेस रिसर्च सेंटरला भेट देऊन परत आलेली आहे. तिथे त्यांना सॅटॅलाइटची प्रत्यक्ष लॉन्चिंग देखील दाखवण्यात येऊन उपग्रह संशोधन, उड्डाण संदर्भात शास्त्रज्ञ भेट, अवकाश संशोधन सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर भेटीमुळे भविष्यात विद्यार्थ्यांचे वैज्ञानिक होण्याचे स्वप्न पूर्ण होण्यास नक्कीच प्रेरणा मिळून मदत होईल असे फाउंडेशनच्यावतीने सुनील कुलकर्णी, अस्मा फातिमा शेख यांनी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे