भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी दरोड्याचा कट उधळला…
दरोडाच्या तयारीत असणाऱ्या सात जणांना अटक..
भुसावळ – बाजारपेठ पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारावर दरोडा आणि मोठ्या गुन्ह्याच्या तयारीत असलेल्या सात जणांना अटक केली आहे. संशयितांकडून दोन गावठी कट्टे, चार काडतूस, चार चाकू, चार तलवारी आणि एक फायटर जप्त करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी याबाबत माहिती दिली.
भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक राहुल वाघ यांना गुप्त बातमी मिळाली होती की भुसावळ-नागपूर हायवेवरील अलिशान वॉटर पार्कच्या मागील भागात काही लोक बंदूक आणि घातक हत्यारांसह गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत उभे आहेत. त्यानुसार, पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी आपल्या पथकास तात्काळ कार्यवाहीसाठी पाठवले.
तपासणी दरम्यान, सात जण संशयित अवस्थेत सापडले. त्यांची झडती घेतली असता, दोन गावठी कट्टे, चार काडतूस, चार चाकू, चार तलवारी आणि एक फायटर हस्तगत झाले. पोलिसांनी इम्रान शेख उर्फ मॉडेल रसूल शेख (भारत नगर, भुसावळ), अरबाज शेख शबीर (तेली गल्ली, भुसावळ), मुजम्मिल शेख मुज्जू शेख हकाम (फैजपूर), शोएब इकबाल खाटीक (फैजपूर), आदित्य सिंग उर्फ विक्की अजय ठाकूर (खंडवा), राहुल उर्फ चिकूराम डेंडवाल (खंडवा), मोहित जितेंद्र मेलावंस (खंडवा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या नेतृत्वात करण्यात आली. पथकातील उपनिरीक्षक मंगेश बेंडकोळी, हवालदार महेश चौधरी, सोपान पाटील, प्रशांत सोनार, भुषण चौधरी, प्रशांत परदेशी, योगेश माळी, राहुल वानखेडे यांनी या कारवाईत भाग घेतला. गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक मंगेश जाधव करीत आहेत.
ईतर महत्वाच्या बातम्या
शहाद्यात नातवाने केली आजोबांची हत्या : अवघ्या साडेचार तासात खुनाचा उलगडा..