फातिमा नगरातील अवैध गॅसभरणा केंद्रावर छापा : गॅस सिलेंडरचा मोठा साठा जप्त..
MIDC पोलीसांची धडक कारवाई.
जळगाव – एमआयडीसी पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारताच पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाने जोरदार कारवाई करत फातेमा नगरात सुरू असलेल्या अवैध गॅस भरणा केंद्रावर छापा टाकत मोठ्या प्रमाणात घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरचा साठा जप्त केला आहे.
गुप्त माहितीच्या आधारे कारवाई एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील फातेमा नगर परिसरातील एका घरात अवैधरित्या गॅस भरणा सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.दुपारी पोलीस पथकाने छापा टाकून शोएब शेख शफी याला ताब्यात घेतले. घराची झडती घेतल्यावर हॉल, किचन, शौचालय अशा ठिकाणी गॅस सिलेंडर मोठ्या प्रमाणात आढळले.
भरवस्तीत घरातच चालणाऱ्या या धोकादायक कारखान्याचा पर्दाफाश करून पोलिसांनी २० घरगुती आणि १४ व्यावसायिक असे एकूण ३४ गॅस सिलेंडर जप्त केले.
महामार्गालगत इच्छादेवी चौका जवळील अवैध गॅस भरणा केंद्रावर काही महिन्यांपूर्वी स्फोट झाला होता, ज्यात ७ नागरिकांनी जीव गमावला होता. या दुर्घटनेनंतर जळगाव शहरातील सर्वच अवैध गॅस भरणा केंद्रांवर बंदी घालण्यात आली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांची बदली करून संदीप पाटील यांची नेमणूक करण्यात आली पदभार घेतल्यानंतर लागलीच अवैध गॅस भरणा केंद्रावर ही कारवाई करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. पथकात पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, हवालदार दत्तात्रय बडगुजर, किशोर पाटील, नितीन ठाकूर, रतन गिते यांनी केली कारवाई.
ईतर महत्वाच्या बातम्या
जिल्हापेठ पोलिसांनी चोरीच्या २० गाड्या केल्या जप्त..
जळगाव शहर पोलिसांची कारवाई चोरीच्या १९ दुचाकी केल्या हस्तगत..