61 गॅस सिलेंडर चोराच्या MIDC पोलिसांनी आवळल्या मुसक्या..

जळगाव – शहरातील एमआयडीसी परिसरात घडलेल्या ६१ गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा भंडाफोड करत एमआयडीसी पोलिसांनी एकास अटक करून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. .
फिर्यादी यांनी भारत पेट्रोलियम, जळगाव येथून ३४२ गॅस सिलेंडर रिफिलींग करून १४ नोव्हेंबर २०२५ च्या रात्री ट्रकमध्ये भरून एमआयडीसी परिसरात पार्क केले होते.पुढील दिवशी म्हणजेच १५ नोव्हेंबर रोजी सकाळी, फिर्यादी ट्रक घेऊन जाण्यासाठी आले असता ट्रक जागेवर दिसला नाही.काही अंतरावर शोध घेतला असता वाहन रस्त्याच्या कडेला उभे असल्याचे दिसून आले. वाहनामधील सिलेंडरची मोजणी करता ३४२ पैकी ६१ सिलेंडर गायब असल्याचे स्पष्ट झाले.यावरून एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्र. ८४८/२०२५ भा.दं.वि. २०२३ कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शोध पथकाने सापळा रचून १८ नोव्हेंबर २०२५ रोजी संशयितांना अटक केली.
अटक केल्यानंतर चौकशीत आरोपीने आपले नाव शेख फिरोज शेख याकुब (रा. नशिराबाद, जळगाव) असे सांगितले.सखोल चौकशीत फिरोजने गुन्ह्याची कबुली देत आपल्या साथीदाराचे नाव सैय्यद मुश्ताक सैय्यद अशफाक (रा. उस्मानिया पार्क, जळगाव) असल्याचे सांगितले. दोन्ही आरोपींनी मिळून ही मोठी चोरी केल्याची माहिती पोलिसांना दिली.
पोलिसांनी संशयितांकडून 1,22,000/- किमतीचे ६१ गॅस सिलेंडर, आणि गुन्ह्यात वापरलेले ₹5,00,000/- किमतीचे आयशर वाहन हस्तगत केले.
सदर कारवाई
पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी,उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि बबन आव्हाड यांच्या पथकाने केली.