40 हजाराची लाच : महिला सरपंचासह,सरपंच पती, मुलगा व खाजगी सेतु सुविधा केंद्र धारक ACB च्या जाळ्यात..
पारोळा – मेहू गावाच्या व्यायामशाळा बांधकाम निधीच्या रकमेचा धनादेश देण्याच्या मोबदल्यात 40 हजार लाच प्रकरणी सरपंचांसह सरपंच पती,सरपंच मुलगा,खाजगी सेतू सुविधा केंद्र धारका जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात.
यातील तक्रारदार हे सन 2017-18 ते सन 2022- 23 मध्ये मेहू गावाचे सरपंच होते. त्या दरम्यान ग्रामपंचायत मेहु यांनी मेहु गावात व्यायाम शाळा बांधण्यासाठी काम दिले होते. सदर व्यायामशाळा बांधकाम करण्यासाठी जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय जळगांव यांच्या मार्फतीने 7,00,000/- रु निधी ग्रामपंचायत मेहु यांनी मंजुर केला होता. त्यानंतर सन 2023 मध्ये जिजाबाई गणेश पाटील यांची मेहु गावाचे लोकनियुक्त सरपंच म्हणून निवड झाली. त्यानंतर तक्रारदार यांनी सरपंच जिजाबाई गणेश पाटील यांना व्यायाम शाळेच्या मंजुर निधीची मागणी संबंधित कन्स्ट्रक्शन कंपनी च्या वतीने केली असता सरपंच जिजाबाई गणेश पाटील यांनी त्यांना प्रथम 4,00,000/- रु चा धनादेश संबंधित कंपनीच्या नावाने दिला व उर्वरित 3,00,000/- रू रक्कमेचा धनादेश देण्याच्या मोबदल्यात सरपंच जिजाबाई गणेश पाटील यांनी दि.31-01-2025 रोजी तक्रारदार यांच्या कडून 1,00,000, 70,000/- रू लाचेची मागणी केली . तसेच गणेश सुपडू पाटील, ( सरपंच पति) यांनी तडजोडीअंती 40,000/- रु लाच रक्कम मागितली.सदर लाच रक्कम देण्यास शुभम गणेश पाटील( देवरे)( सरपंच यांचा मुलगा ) यांनी प्रोत्साहन देऊन दि.१२ रोजी शुभम गणेश पाटील( देवरे)( सरपंच यांचा मुलगा ) यांच्या सांगण्यावरून समाधान देवसिंग पाटील (खाजगी सेतु सुविधा केंद्र धारक बोदडे)यांनी लाच रक्कम स्वीकारली म्हणून पारोळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर कारवाई लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर,पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव GPSI सुरेश पाटील पोकॉ राकेश दुसाने पोकॉ अमोल सुर्यवंशी यांनी केली.