दादासाहेब चौधरी वन प्रशिक्षण संस्थेत वनरक्षक प्रशिक्षण सत्राचा दीक्षांत समारंभ संपन्न..
जळगाव दि. 28 : दादासाहेब चौधरी वन प्रशिक्षण संस्था, पाल येथे दिनांक २७ मार्च रोजी नवनियुक्त वनरक्षक प्रशिक्षण सत्राचा (सप्टेंबर २०२४ ते मार्च २०२५) दीक्षांत समारंभ आणि प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
सहा महिन्यांच्या या प्रशिक्षण सत्रात नागपूर, छत्रपती संभाजी नगर आणि नाशिक वनवृत्तातील एकूण ५३ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. प्रशिक्षण सत्रात वानिकी आणि संबंधित २१ विषयांचे प्रशिक्षण देण्यात आले. दोन तिमाही परीक्षा आणि सेमिनार देखील घेण्यात आले.या परिक्षांमध्ये सर्व ५३ प्रशिक्षणार्थी हे उत्तीर्ण झालेले असून,त्यापैकी ७ प्रशिक्षणार्थींनी ७५% पेक्षा जास्त गुण मिळवून ‘सन्मान प्रमाणपत्र’ पटकावले, तर उर्वरित ४६ प्रशिक्षणार्थींना ‘उत्तीर्ण प्रमाणपत्र’ देण्यात आले. या सत्रापासून सर्व वनरक्षक प्रशिक्षणार्थींना एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या चेतना केंद्रातर्फे ‘Certificate Programme in Forestry’ या अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र देखील देण्यात आले.
सत्राच्या परीक्षेत विशिष्ट विषयात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या प्रशिक्षणार्थींना सुवर्णपदक देऊन गौरवण्यात आले. ज्यात,वन संवर्धन व वन व्यवस्थापन भाग-१.२.३ जेएफएम कार्यक्रम, वन उपयोगिता पदक: नंदकिशोर जनार्धन थोरात वन्यजीव व्यवस्थापन, जैवविविधता व्यवस्थापन, कुरण व्यवस्थापन विषयक पदक: जीवन केरप्पा चोरमले अभियांत्रिकी व सर्वेक्षण पदक: नंदकिशोर जनार्धन थोरात
वन विषयक कायदा: अमोल बालासाहेब सोनवणे
क्रॉस कंट्री पदक: शुभम नारायण जाधव
सर्वोत्कृष्ट/अष्टपैलू गुणसौजन्यपूर्ण वागणूक, प्रत्येक कार्यातील सर्वोत्कृष्ट कामगिरी: विठ्ठल शंकर मुळे
प्रशिक्षण सत्रात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या नंदकिशोर जनार्धन थोरात यांना सुवर्णपदक, स्वप्नील डिलेराम गाते यांना रौप्य पदक व अनिल गुलाबराव वाघ यांना कांस्य पदकांने गौरविण्यात आले. कार्यक्रमात दादासाहेब चौधरी वन प्रशिक्षण संस्थेचे संचालक हेमंत शेवाळे यांनी सत्राचा अहवाल आणि निकाल वाचन केले. तर प्रमुख अतिथी म्हणून विभागीय वन अधिकारी दक्षता धुळे वनवृत्त धुळे राजेंद्र सदगीर आणि एसएनडीटी महिला विद्यापीठ पुणे संकुलचे प्राध्यापक डॉ. सचिन देवरे उपस्थित होते. त्यांनी नवप्रशिक्षितांना मार्गदर्शन केले आणि वन, वन्यजीव संवर्धन आणि मानव वन्यजीव संघर्षाबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय जमीर शेख, उपवनसंरक्षक, यावल वनविभाग, जळगाव यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि भविष्यात प्रशिक्षणाचा उपयोग वनसंरक्षण, वनव्यवस्थापन आणि वनसंवर्धनात होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमास वन प्रशिक्षण संस्थेतील वनक्षेत्रपाल अंजली बोरावार, वनक्षेत्रपाल अजय बावणे, व्याख्याते रागीब अहमद, संस्थेतील लेखापाल, लिपिक आणि इतर कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले. प्रशिक्षणार्थींचे पालक आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.