उत्कृष्ट कामगिरी स्नेहा पवार व कृष्णा इंगळे यांचा होणार सन्मान..
जळगाव :- जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्यापासून नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याची मालिका सुरू केली आहे.त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषदेच्या विभागप्रमूख व गटविकास अधिकारी यांना प्रशासकीय काम करताना प्रोत्साहन मिळावे.चांगले काम केल्याबद्दल त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळावी या दृष्टीने महिनाभरात विविध विषयांबाबत उत्तम काम करणाऱ्या विभागप्रमुख व गटविकास अधिकारी यांना प्रोत्साहनपर अर्ध शासकीय पत्र देण्याची घोषणा केली आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांची नांदेड जिल्हा परिषद येथून जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर बदली झाल्यानंतर करनवाल यांनी २० मार्च रोजी पदभार स्वीकारल्यानंतर विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची घोषणा करण्याची मालिका सुरू केली आहे.एव्हडेच नव्हे तर घोषणा करण्यात येत असलेल्या उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी देखील करण्यात येत आहे.प्रशासकीय काम करताना येणाऱ्या अडचणींवर मात करून विहित कालावधीत ठरलेली कामे पूर्ण करून त्या बाबींचा लाभ सामान्य घटकापर्यंत पोहचविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या विभागप्रमुख व गटविकास अधिकारी यांची दर महिन्याला निवड करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याच्या दृष्टीने दर महिन्याला अर्धशासकीय प्रोत्साहनपर पत्र देण्यात अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे.या उपक्रमांतर्गत एप्रिल महिन्यासाठी जिल्हा परिषदेचे एक विभागप्रमुख व एक गटविकास अधिकारी यांची यासाठी निवड करण्यात आली आहे.
मे महिन्यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार व जामनेर येथील गटविकास अधिकारी कृष्ण इंगळे यांची निवड करण्यात आली आहे. स्नेहा पवार यांना. पारदर्शक बदली प्रक्रिया राबविल्याबद्दल तर जामनेर गट विकास अधिकारी यांना घरकूल योजनेच्या अंमलबजावणीत केलेल्या कामगिरी बद्दल निवड करण्यात आली आहे.