यावल नगरपरिषदेत सत्यम पाटील यांना अतिरिक्त पदभार म्हणजे विरोधकांना मोठी चपराक..
यावल दि.४ ( सुरेश पाटील ) – यावल नगरपरिषद पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता म्हणून यावल येथून नुकतीच बदली झालेले सत्यम जयवंतराव पाटील यांना अतिरिक्त पदभार देण्यात आल्याने सत्यम पाटील यांना यावल नगरपरिषदेच्या कामकाजात विरोध करणाऱ्यांना मोठी चपराक बसली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर विकास शाखा सहआयुक्त जनार्दन पवार यांचा दि.२ जुलै २०२५ चा आदेश प्रत्यक्ष बघितला असता त्यात नमूद करण्यात आले आहे की कल्पना बबलू घारू, बबलू गणेश घारू, संतोष बन्सी खर्चे यांचा विनंती अर्ज आणि नगरपरिषद प्रशासन संचालनालय मुंबई आयुक्त तथा संचालक यांच्याकडील दि.२३ नोव्हेंबर २०२१ चे परिपत्रक लक्षात घेता नगरपरिषदांचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी नगरपरिषदा / नगरपंचायतीतील रिक्त असणाऱ्या संवर्गातील पदावर जळगाव जिल्ह्यातील ज्या नगर परिषदेमध्ये सवर्गीय पद भरलेले / कार्यरत आहे, अशा सवर्गीय कर्मचाऱ्याकडे अतिरिक्त पदभार सोपविण्याची कार्यवाही करण्याचे अधिकार प्राप्त आहेत.
त्यानुसार भडगाव नगरपरिषद मधील पाणीपुरवठा अभियंता सत्यम पाटील यांची यावल नगरपरिषद मध्ये अतिरिक्त पदभार देण्यात येत आहे.
यावल नगरपरिषदेत नगरपरिषदेचे कामकाज करताना विरोधकांच्या सोयीनुसार सत्यम पाटील कामकाज करीत नसल्याने त्यांच्या बदलीची मागणी काही विरोधकांनी केली होती परंतु सत्यम पाटील यांनी यावल नगरपरिषदेत प्रशासकीय कार्यकाळात आपल्या बौद्धिक कौशल्याच्या बळावर ज्या विविध योजना यशस्वीपणे राबविल्या त्याची दखल घेत काहींनी त्यांच्याकडे पुन्हा पदभार सोपविण्याची मागणी केली होती आणि त्यात त्यांना यश मिळाल्याने विरोधकांना मोठी चपराक बसल्याचे राजकारणात बोलले जात आहे.