काळविटाच्या शिंग व मांसा सह नाकाबंदीत दोन जण ताब्यात..

चोपडा – दि.१७ रोजी बोरअजंटी येथील बोरअजंटी-वैजापुर रस्त्यावर वनविभाग व पोलीस यांच्या संयुक्त गस्ती व नाकाबंदी दरम्यान मोटार सायकल वरून येणाऱ्या संशयीत इसम व मोटारसायकल ची तपासणी केली असता पिवळ्या गोणीत दोन हरीण काळवीटाचे शिंगे व शिजवलेले मांस सापडले.

वनविभाग व पोलीस यांच्यासह संयुक्त गस्ती व नाकाबंदी दरम्यान बोरअजंटी ०२ इसम मोटार सायकल वर पिवळ्या गोणीत दोन हरीण काळवीटाचे शिंगे व शिजवलेले मांस घेवून जातांना मिळून आल्याने सदरील इसमांना चौकशी कामी ताब्यात घेऊन घटनास्थळी वन्यप्राण्यांच्या शिकार करुन काळवीटाचे शिंगे २ नग व शिजवलेले मांस (मटन) अंदाजे २ कि.ग्रॅ व मोटार सायकल स्प्लेंडर प्लस कंपनीची क्र. MP-१०/NC-४८५७ व दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आले. सदर ०२ आरोपी इसम यांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी नाव वांग या पुसल्या बारेला उ. वय ४८ रा टाक्यापाणी त्ता.वरला जि. बडवाणी, ह.मु बोरखेडा ता.धरणगांव व धुरसिंग वलका बारेला उ.व.४५ रा आत्मज बधुरिया-७, ग्राम वरुड जि. खरगोन ह. मु. पळासखेडा यांना अटक करण्यांत आली.
यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी स्पष्ट केले की, “वन्यप्राण्यांना त्यांच्या अधिवासातून पळवून लावणे, त्याचे शिकारी करीता फासकी / वाघूर लावणे वा त्याची शिकार करणे इ. कृत्ये वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ९ चे उल्लंघन असून अशा उल्लंघनाकरीता जास्तीत जास्त ७ वर्षे कारावासाची तसेच रु. २५,०००/- पर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे. सदर गुन्हा हा अजामीनपात्र तसेच दखलपात्र स्वरुपाचा आहे. यास्तव वन्यप्राण्यांची शिकार करणा-यांवर कडक कारवाई करण्यात येईल”
सदरची कारवाई , उप वनसंरक्षक जमीर शेख, यावल वनविभाग, जळगाव व पोलीस निरीक्षक अनिल भवारी, ग्रामीण पोलीस स्टेशन चोपडा यांच्या पथकाने केली.