स्कूल बस चालकाचा शाळकरी विद्यार्थिनीवर अत्याचार..

पाचोरा – तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या दहावीतील विद्यार्थिनीवर स्कूल बसचालकानेच शेतात नेऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना गेल्या महिन्यात घडली. याप्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्याच्याविरुध्द १९ ऑगस्ट रोजी पोलिसात बलात्कारासह पोस्कोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अबिद हुसेन शेख जलील (३८, रा.शेंदुर्णी, ता.जामनेर) असे अटक केलेल्या बसचालकाचे नाव असून त्याला पाचोरा न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.पीडितेच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार पाचोरा तालुक्यातील एका गावातील काही विद्यार्थी शिक्षणासाठी शेंदुर्णी (ता. जामनेर) येथे स्कूल बसने ये-जा करतात. गेल्या महिन्यात स्कूल बसचालक अबिद हुसेन शेख जलील (३८, रा.शेंदुर्णी, ता.जामनेर) हा दुचाकीने संबंधित मुलीच्या गावात आला होता. तेव्हा ही मुलगी बाहेर जात असताना संशयिताने ‘तू मला आवडतेस’ म्हणून पाठलाग करीत तिचा विनयभंग केला.
घडलेला प्रकार पीडितेने घरी सांगितल्यानंतर याप्रकरणी पीडितेच्या वडिलांनी पोलिसात फिर्याद दिली होती. पीडित मुलीने गुरुवारी पुरवणी जबाब दिला. त्यात म्हटले आहे की, बसचालकाने माळेगाव (ता.जामनेर) येथील शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. तसेच या मुलीला फोनवरून वारंवार धमकावत व अश्लील बोलत छळ केला. गावातून दररोज मोठ्या संख्येने विद्यार्थी – विद्यार्थिनी शेंदुर्णी (ता. जामनेर) येथे स्कूल बसने ये-जा करतात. बसचालकाने या आधी देखील कुणाची छेड काढली आहे का? याबाबतही पोलिस तपास करीत आहेत. आरोपीवर पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ईतर महत्वाच्या बातम्या
2 हजारांची लाच : दोघ लाचखोर सहा.फौजदा्रांसह खाजगी पंटर ACB च्या जाळ्यात..
एरंडोल जवळ भीषण अपघात भरधाव ट्रॅकने घेतला एकाचा बळी..
शिरसोलीत मिठाईच्या दुकानावर अन्न व औषध प्रशासनाची धाड : 151 किलोचा साठा जप्त..