निमखेडी रोडवरील अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश..

जळगाव : तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत निमखेडी रोड परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या अवैध वेश्या व्यवसायावर पोलिसांनी धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित अपार्टमेंटमध्ये काही दिवसांपासून गुप्तपणे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती तालुका पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला. कारवाईदरम्यान काही महिला व संशयित व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले असून घटनास्थळावरून आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केली. शहर व ग्रामीण भागात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात पुढील काळातही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.