जळगाव

महसूल वाढीसाठी उपमहापौर मनोज चौधरी यांचे कडक निर्देश : नवीन घरांची घरपट्टी आकारणीसाठी मनपाची मोहीम..

जळगाव – उपमाहापौर मनोज सुरेश चौधरी यांच्या दालनात उपायुक्त शिंदे मॅडम, हाऊस टॅक्स विभागीय अधिकारी, प्रभाग अधिकारी, टी.पी. अधिकारी तसेच नवीन घर मॅपिंग संबंधित कर्मचाऱ्यांची संयुक्त आढावा बैठक पार पडली. शहरातील नव्याने उभ्या राहिलेल्या मालमत्तांवर घरपट्टी आकारणी व महसूल वाढ या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीदरम्यान शहरातील अनेक नवीन घरे बांधून पूर्ण होऊन वापरात आली असतानाही संबंधित मालमत्तांची घरपट्टी नोंदणी अद्याप झालेली नसल्याचे निदर्शनास आले. यामुळे महानगरपालिकेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्याबद्दल उपमहापौर मनोज चौधरी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.यावेळी शहरातील नव्याने उभारण्यात आलेल्या सर्व मालमत्तांचे तात्काळ सर्वेक्षण करून त्यांची घरपट्टी नोंदणी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच मॅपिंग, बांधकाम परवानगी आणि घरपट्टी विभाग यांच्यात अधिक समन्वय साधून महसूल वाढीसाठी प्रभावी यंत्रणा उभारण्याबाबत चर्चा झाली.

उपमहापौर मनोज चौधरी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, घर मॅपिंगसाठी महानगरपालिकेमार्फत करोडो रुपयांची एजन्सी नियुक्त करण्यात आली आहे. मात्र संबंधित मॅपिंग कॉन्ट्रॅक्टरकडून अपेक्षित दर्जाचे आणि प्रभावी काम होत नसल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. शहरातील अनेक नवीन बांधकामांची माहिती अद्याप नोंदवली गेलेली नसल्याने मनपाच्या महसुलाचे नुकसान होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.संबंधित एजन्सीकडून जबाबदारीने व काटेकोरपणे काम करून घेण्यात यावे, प्रत्येक नवीन बांधकामाची अचूक माहिती संकलित करून तत्काळ घरपट्टी आकारणी करण्यात यावी तसेच कामात हलगर्जीपणा आढळल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असे कडक निर्देशही त्यांनी दिले.

महानगरपालिकेच्या महसुलात वाढ होणे ही काळाची गरज असून प्रशासनाने अधिक सक्षम, पारदर्शक आणि जबाबदारीने काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे