जळगाव

डिझेल टंचाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन..

जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर चार तास शासकीय वाहने रोखली; मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा.

जळगाव : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेती मशागतीसाठी तसेच शेतमाल वाहतुकीसाठी आवश्यक असलेले डिझेल उपलब्ध होत नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान दुपारी ४ ते सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील एकही शासकीय वाहन बाहेर जाऊ देण्यात आले नाही.

शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, मळणी यंत्रे तसेच इतर कृषी वाहनांसाठी डिझेल मिळत नसल्याने शेतीची कामे ठप्प होण्याची भीती निर्माण झाली आहे. आगामी काळात पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.आंदोलनकर्त्यांनी शासनाकडे तातडीने डिझेल पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. प्रशासनाकडून उद्या दुपारी २ वाजेपर्यंत मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

मात्र, निर्धारित वेळेत मागण्या पूर्ण न झाल्यास संपूर्ण जिल्ह्यात तहसील कार्यालये तसेच इतर शासकीय कार्यालयांबाहेर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. तसेच कोणतेही शासकीय अधिकारी, आमदार किंवा खासदार यांची वाहने जिल्ह्यात फिरू देणार नाहीत, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.

या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद बापू पाटील, वाय. एस. महाजन, मंगला पाटील, अशोक लाडवंजारी, रमेश पाटील, संग्रामसिंह सूर्यवंशी, रिकू चौधरी, सुनील माळी, राजू मोरे, किरण राजपूत, मजर पठाण, गौरव वाणी, संजय पाटील, आकाश हिवाळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे