जळगाव

सेक्स रॅकेटमधील महिला बांगलादेशी : पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर..

जळगाव : जळगाव तालुका पोलिसांनी निमखेडी रोडवरील ब्रम्हांडनायक अपार्टमेंट येथे सुरू असलेल्या सेक्स रॅकेटवर केलेल्या कारवाईदरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील एका महिलेला पोलिस तपासात बांगलादेशी असल्याचे निष्पन्न झाले असून, तिच्याकडे असलेले आधार कार्ड बनावट असल्याचेही उघड झाले आहे.

जळगाव तालुका पोलीस स्टेशन येथे CRN-151/26 अन्वये अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 च्या कलम 3, 4, 5 व 6 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक 21 मे 2026 रोजी निमखेडी रोडवरील ब्रम्हांडनायक अपार्टमेंट येथे सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकला होता. या कारवाईत आरोपी सागर सोनवणे (रा. धरणगाव) व…मोरे (रा. जळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कारवाईदरम्यान दोन महिलांची सुटका करून त्यांना आशादीप संस्थेत दाखल करण्यात आले होते. तपासादरम्यान पोलिसांनी संबंधित महिलांची सखोल चौकशी केली. यावेळी एका महिलेकडून संशयास्पद माहिती मिळाल्याने पोलिसांनी “प्रॉक्टिव्ह अप्रोच” स्वीकारत तांत्रिक आणि बायोमेट्रिक पडताळणी केली.

या तपासात जाकिया अबुल काहेर फोकर (वय 28) ही महिला बांगलादेशातील खुलना येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. सुरुवातीला संबंधित महिलेकडून ओळख लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलिसांनी तिचा मोबाईल डेटा, कागदपत्रे तसेच बायोमेट्रिक पडताळणी तपासल्यानंतर तिच्याकडे असलेले आधार कार्ड बनावट असल्याचे समोर आले.

या प्रकरणामुळे स्थानिक पातळीवर खळबळ उडाली असून, सदर महिला भारतात कशी आली, तिच्या मागे कोणते रॅकेट कार्यरत आहे का, तसेच बनावट कागदपत्रे कोणी तयार करून दिली याचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

ईतर महत्वाच्या बातम्या 

निमखेडी रोडवरील अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश..

डिझेल टंचाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन..

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे