जामनेर

फत्तेपूर हद्दीतील सामूहिक अत्याचार प्रकरणी १५ पैकी १४ आरोपी अटकेत; व्हिडिओ व्हायरल प्रकरणाचाही तपास सुरु..

जळगाव –  जिल्ह्यातील फत्तेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या कथित सामूहिक अत्याचार प्रकरणात पोलिसांनी जलद कारवाई करत १५ पैकी १४ आरोपींना अटक केली असून उर्वरित आरोपीचा शोध सुरू आहे. या प्रकरणातील अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वयेही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ जून २०२६ रोजी देऊळगाव–कापूसवाडी रस्त्यावरील ठांबरडा नाल्याजवळील निर्जन परिसरात ४० वर्षीय पीडित महिला तिच्या परिचयातील एका व्यक्तीसोबत असताना काही जण तेथे आले. त्यानंतर महिलेवर जबरदस्तीने सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच, घटनेदरम्यान काही संशयितांनी मोबाईल फोनवर व्हिडिओ चित्रीकरण केल्याचेही तपासात समोर आले आहे. या घटनेतील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून तपासाला गती दिली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलिस अधीक्षकांनी घटनास्थळी भेट देत तपासाचा आढावा घेतला.

या प्रकरणी फत्तेपूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४१/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७०(१) , ७७ तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) कलम ६६ आणि ६७ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी आतापर्यंत १५ पैकी १४ मुख्य व सहआरोपींना अटक केली असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास फत्तेपूर पोलीस करीत आहेत

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे