भुसावळ

सोलर सिस्टीम मंजुरीसाठी २ हजारांची लाच :  महावितरणचा अतिरिक्त कार्यकारी अभियंता ACB च्या जाळ्यात..

भुसावळ, : सोलर सिस्टीम बसविण्यासाठी आवश्यक मंजुरी व रिलीज ऑर्डर देण्यासाठी २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना महावितरणच्या भुसावळ शहर-१ कार्यालयातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता नितीन अभिमन्यु पाटील (वय ४९) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जळगाव पथकाने रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे महावितरण विभागात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावाने सोलर सिस्टीम बसविण्याची एजन्सी आहे. त्यांच्या माध्यमातून भुसावळ शहरातील दोन ग्राहकांनी सोलर सिस्टीम खरेदी केली होती. या दोन्ही प्रकरणांमध्ये महावितरणकडून मंजुरी व रिलीज ऑर्डर मिळण्यासाठी तक्रारदारांनी ऑनलाईन अर्ज सादर केले होते. संबंधित प्रस्तावांची तपासणी करून मंजुरी देण्याची जबाबदारी अतिरिक्त कार्यकारी अभियंता नितीन पाटील यांच्याकडे होती. मात्र, मंजुरी व रिलीज ऑर्डर प्रलंबित ठेवत पाटील यांनी प्रत्येक प्रकरणासाठी १ हजार रुपये, अशा दोन प्रकरणांसाठी एकूण २ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. याबाबत तक्रारदारांनी जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली असता लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर २२ जुलै रोजी एसीबीने सापळा रचला. यावेळी नितीन पाटील यांनी तक्रारदारांकडून २ हजार लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

सदर कारवाई

एसीबीचे पोलीस उप अधिक्षक,योगेश ठाकुर, पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे, श्रेणी पोउनि /सुरेश पाटील, मपोहेका /संगीता पवार, पोहेका/बाळु मराठे, यांनी केली.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे