भुसावळ

३० हजाराची लाच : सहकार अधिकारी व दोन लेखापरीक्षक ACB च्या जाळ्यात..

भुसावळ | प्रतिनिधी – सावकारी परवाना मंजूर करून देण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग  जळगाव यांनी  कारवाई केली असून सहकार अधिकारी व दोन प्रमाणित लेखापरीक्षकांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत कारवाई  करण्यात आली.

या प्रकरणात  विजय विनायकराव गरूड (सहकार अधिकारी, धुळे), सुरेश जनार्दन विसपुते (प्रमाणित लेखापरीक्षक, भुसावळ) आणि हेमंत प्रकाश काळे (प्रमाणित लेखापरीक्षक, जळगाव) यांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे भुसावळ येथील रहिवासी असून त्यांना सावकारी व्यवसायासाठी परवाना काढावयाचा होता. त्यासाठी त्यांनी दिनांक ३० मार्च २०२६ रोजी सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालय, भुसावळ येथे लेखी अर्ज सादर केला होता.

तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, संबंधित कार्यालयातील सहकार अधिकारी विजय गरूड यांनी परवाना मंजुरीच्या मोबदल्यात २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली व त्यांना प्रमाणित लेखापरीक्षक सुरेश विसपुते यांच्याकडे पाठविले. त्यानंतर तक्रारदारांनी दिनांक २३ एप्रिल २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव यांच्याकडे तक्रार दाखल केली.

तक्रारीनंतर करण्यात आलेल्या पडताळणी कारवाईदरम्यान सुरेश विसपुते यांनी लोकसेवक विजय गरूड, स्वतः तसेच हेमंत काळे यांच्या नावाने एकूण ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.दि. १५ जून २०२६ रोजी राबविण्यात आलेल्या सापळा कारवाईत भुसावळ शहरातील नाहाटा चौफुली परिसरात सुरेश विसपुते यांनी तक्रारदाराकडून पंचांसमक्ष ३० हजार रुपयांची रक्कम स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. यावेळी हेमंत काळे यांनी फोनवरून संपर्क साधून रक्कम स्वीकारण्यास प्रोत्साहन दिल्याचा आरोप आहे. तसेच या रकमेपैकी ५ हजार रुपये सहकार अधिकारी विजय गरूड यांच्या मागणीनुसार फोन-पे द्वारे पाठविण्यात आल्याचेही प्राथमिक तपासात समोर आले आहे.या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ चे कलम ७, ७अ व १२ अन्वये पुढील गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून तपास सुरू आहे.

सदर कारवाई

एसीबी चे पोलीस उपाधीक्षक योगेश ठाकूर,पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांनी काम पाहिले. कारवाईत पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे तसेच ला.प्र.वि. जळगाव येथील अधिकारी व कर्मचारी यांनी केली.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे करीत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे