600 रुपयांची लाच : बोदवड पंचायत समितीचा कनिष्ठ सहाय्यक ACB च्या जाळ्यात..

जळगाव – राज्य शासनाच्या वृद्ध साहित्यिक व कलाकार मानधन योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रस्ताव तयार करून जिल्हा परिषदेकडे पाठविण्याच्या मोबदल्यात 3 हजाराची लाच मागणाऱ्या पंचायत समिती बोदवड येथील कनिष्ठ सहाय्यकाला 600 रुपयाची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे पंचायत समिती प्रशासनात एकच खळबळ उडाली आह. उमेश शामकांत सपकाळे, कनिष्ठ सहाय्यक, पंचायत समिती कार्यालय, बोदवड, असे त्याचे नाव व पद आहे.या कारवाईमुळे पंचायत समिती प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे
तक्रारदार हे वाद्य कलाकार असून त्यांनी शासनाच्या वृद्ध साहित्यिक व कलाकार मानधन योजनेसाठी ‘आपले सरकार’ पोर्टलवर ऑनलाइन अर्ज केला होता. त्यानंतर अर्जाची प्रत पुढील कार्यवाहीसाठी पंचायत समिती बोदवड येथे जमा करण्यात आली होती. अर्जाच्या स्थितीची चौकशी करण्यासाठी तक्रारदार पंचायत समितीत गेले असता, प्रस्ताव तयार करून तो जिल्हा परिषद जळगावकडे पाठविण्यासाठी कनिष्ठ सहाय्यक, उमेश सपकाळे यांनी ३ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला. याप्रकरणी तक्रारदारांनी ३० जुलै २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव यांच्याकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर ACB ने पंचांसमक्ष पडताळणी केली. तडजोडीनंतर कनिष्ठ सहाय्यक, उमेश सपकाळे याने ६०० रुपये लाच स्वीकारण्यास सहमती दर्शविली.
त्यानुसार ACB ने सापळा रचला. पंचायत समिती बोदवड कार्यालयातील सामान्य प्रशासन कक्षाबाहेरील गॅलरीमध्ये उमेश सपकाळे यांनी पंचांसमक्ष ६०० रुपयांची लाच स्वतः स्वीकारताच ACB च्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले.या प्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
सदर कारवाई
जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक, योगेश ठाकूर,पोलीस निरीक्षक, स्मिता नवघरे, पाहेकॉ/बाळू मराठे, पोकों/ राकेश दुसाने, पोकॉ/अमोल सुर्यवंशी यांनी केली.