जळगाव

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार..

जळगाव दि. 9 प्रतिनिधी : राज्यसभा खासदार तथा ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘प्रहार’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने चित्रपटातील प्रमुख कलाकारांसह स्वतः खासदार उज्ज्वल निकम हे रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ रोजी जळगाव येथे उपस्थित राहणार आहेत. संध्याकाळी 4.45 वाजेला

 

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पासून ते छत्रपती संभाजी नाट्यगृह दरम्यान मोटारसायकल रली निघेल.

‘प्रहार’ चित्रपटात अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री वामिका गब्बी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. खासदार उज्ज्वल निकम यांच्या जीवनातील विविध पैल, त्यांच्या कार्याचा प्रवास आणि न्यायव्यवस्थेतील योगदानावर आधारित या चित्रपटाची उत्सुकता चित्रपटप्रेमींमध्ये आहे.या पार्श्वभूमीवर जळगाव येथे आयोजित कार्यक्रमाला अभिनेता राजकुमार राव, अभिनेत्री वामिका गब्बी तसेच खासदार उज्ज्वल निकम यांची उपस्थिती लाभणार आहे. या चित्रपटा बद्दल राजकुमार राव आणि वामिका गब्बी यांच्या सोबत संवाद साधण्याची संधी जळगावकर रसिकांना असणार आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन ‘खासदार उज्ज्वल निकम कार्यक्रम मित्र परिवार समिती’ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन हे समितीचे अध्यक्ष आहेत. नंदकुमार बेंडाळे, भरत अमळकर, अनिश शहा, अनिल कांकरिया, युसुफ मकरा, डॉ रेखा महाजन, डॉ राजेश पाटील, किरण बच्छाव, प्रकाश पाटील, अमर कुकरेजा, ऍड भरत देशमुख, रोहित निकम, जितेंद्र लाठी, प्रसाद सूर्यवंशी, राहुल पवार, प्रतिक्षा सोनवणे, विराज कावडिया, हर्षल पाटील हे सदस्य या समितीचे प्रमुख आहेत.जळगावकरांसाठी हा विशेष कार्यक्रम खुला असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समितीच्या वतीने पत्रकार परिषदेतुन समितीचे अध्यक्ष अशोक जैन यांच्यासह पदाधिकारी यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे