दहिगाव येथे कान नाक घसा तपासणी शिबिर व सामुदायिक आरोग्य तपासणी शिबिरास मिळाला ग्रामस्थांचा उत्तम प्रतिसाद..

यावल( प्रतिनिधी)- तालुक्यातील दहिगाव येथील प्राथमिक उपकेंद्रात आज दिनांक १० रोजी डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मदाय रुग्णालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत काना घसा शस्त्रक्रिया तपासणी व सामुदायिक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्या उत्तम प्रतिसाद मिळाला.

या शिबिराचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील गोरगरीब व गरजू रुग्णांना मोफत व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हा होता. शिबिरात
कानाच्या शस्त्रक्रिया: कानाचा पडदा फाटणे, कानातून पू येणे, ऐकू न येणे ,नाकाच्या शस्त्रक्रिया: नाकाच्या हाडाचा त्रास, नाकात मांस वाढणे, सायनस घशाच्या शस्त्रक्रिया: घशात गाठी,टॉन्सिल आवाज बदलणे,गिळताना त्रास होणे सामुदायिक आरोग्य: रक्तदाब, मधुमेह व सर्वसाधारण आरोग्य तपासणी करण्यात आली.
या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची सखोल तपासणी करून त्यांना योग्य मार्गदर्शन केले. ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे. अशा पात्र रुग्णांच्या आयुष्मान भारत कार्डद्वारे पूर्णपणे मोफत शस्त्रक्रिया जळगाव येथील रुग्णालयात करण्यात येणार आहेत.या वेळी श्री गणेश आरोग्य सेवा व परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. या शिबिराचा यावल तालुक्यातील अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला व युवकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला.
शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या ENT विभागाचे डॉक्टर कान नाक घसा तपासणी डॉक्टर विकास पवार आणिहोमिओपॅथिक डॉक्टर सानिका राय गोदावरी हॉस्पिटल यांनी केली,त्यांचे सह नर्सिंग पथक व स्थानिक स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत डॉ. उत्कर्ष पाटील वैद्यकीय महा विद्यालयाच्या वतीने हे शिबिर घेतले जात आहे. दिनांक १३ ऑक्टोबर रोजी सावखेडा सीम येथे डॉक्टर प्रसाद हंबर्डे डोंगर कठोरा १५ ऑक्टोबर रोजी.२४ ऑक्टोबर रोजी कासारखेडा तर शिरसाड साकळी या ठीकाणी २९ ऑक्टोबर रोजी या शिबिराच्या आयोजन करण्यात आलेले आहे तरी गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय यांचे तर्फे करण्यात आले आहे.