यावल

जनसेवेचा ध्यास, अन्यायाविरुद्ध संघर्ष! अकलूदमध्ये युवा क्रांती फाउंडेशनचा संघटनात्मक एल्गार..

कार्यकर्त्यांना सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन; महिला व बालकांवरील अत्याचारांविरोधात आवाज उठविणार, पुढील महिन्यात जिल्हास्तरीय मेळाव्याचे नियोजन

यावल(प्रतिनिधी )तालुक्यातील अकलूद,येथे सर्व जाती धर्माच्या समाजातील अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देणे, गरजू नागरिकांच्या अडचणी सोडविणे आणि सामाजिक प्रश्नांवर प्रभावीपणे काम करणे, या उद्देशाने युवा क्रांती फाउंडेशन, पोलीस मित्र, ग्राहक, पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटनेने संघटनात्मक कार्याला गती देण्याचा निर्धार केला आहे. अकलूद येथील बीसीएम हॉलमध्ये बुधवार, दि. १४ ऑक्टोबर रोजी आयोजित कार्यकर्ता आढावा बैठकीत सामाजिक कार्याचा विस्तार करण्यासह आगामी उपक्रमांचे नियोजन करण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील विविध पदाधिकारी, महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमुळे बैठकीला उत्साहपूर्ण वातावरण लाभले.

फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र सूर्यवंशी आणि महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष करताडसिंग राठोड यांच्या आदेशानुसार या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थितांचा परिचय करून देण्यात आला. मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केल्यानंतर संघटनेच्या आगामी वाटचालीसंदर्भात चर्चा करण्यात आली.

‘समाजासाठी काम करा, गरजूंना न्याय मिळवून द्या!’

बैठकीत महाराष्ट्र प्रदेश सल्लागार अशोक जोशी महाराज यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सामाजिक सेवेचे महत्त्व अधोरेखित केले. समाजातील प्रत्येक घटकाच्या अडचणी समजून घेऊन त्यांना मदत करणे, ही संघटनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.सण-उत्सव, यात्रा आणि सार्वजनिक कार्यक्रमांच्या वेळी पोलीस प्रशासनाला आवश्यक सहकार्य करावे. समाजात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनासोबत समन्वय साधून निःशुल्क सामाजिक सेवा देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.महिलांवरील अन्याय-अत्याचार, बालकांवरील अत्याचार, लैंगिक शोषण आणि इतर सामाजिक समस्यांकडे दुर्लक्ष न करता पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेने पुढाकार घ्यावा. गोरगरीब, वंचित आणि गरजू नागरिकांच्या मदतीसाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम केल्यास संघटनेची समाजातील विश्वासार्हता अधिक वाढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

जिल्हास्तरीय मेळाव्याच्या तयारीला सुरुवात,

बैठकीत संघटनेच्या जिल्ह्यातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. विविध तालुक्यांमध्ये संघटनेचा विस्तार करणे, नवीन कार्यकर्त्यांना संघटनेशी जोडणे, सामाजिक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय वाढविणे या विषयांवर चर्चा झाली.याच पार्श्वभूमीवर पुढील महिन्यात जळगाव जिल्ह्यात भव्य जिल्हास्तरीय मेळावा आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले. या मेळाव्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना एकत्र आणून संघटनेच्या आगामी कार्याची दिशा निश्चित करण्यावर भर दिला जाणार आहे.महिला पदाधिकाऱ्यांच्या सहभागातून सामाजिक कार्याला बळ मिळणार असुन या बैठकीला महिला पदाधिकाऱ्यांचीही लक्षणीय उपस्थिती होती. महिला व बालकांच्या प्रश्नांवर काम करणे, अन्यायग्रस्तांना मदत करणे आणि सामाजिक उपक्रमांमध्ये महिलांचा सहभाग वाढविणे यासंदर्भात उपस्थितांनी आपली मते मांडली. संघटनेच्या माध्यमातून जनहिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्याची गरजही यावेळी व्यक्त करण्यात आली.

जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश सल्लागार अशोक जोशी महाराज, आकाश तेजराव जोशी, जळगाव जिल्हाध्यक्ष अशोक तायडे, जिल्हा महिला अध्यक्ष अर्चना रोटे, महिला उपाध्यक्ष पूजा राठोड, रंजना सोनवणे, मनीषा शिंदे, भुसावळ महिला तालुकाध्यक्ष मिठू मुखर्जी, यावल तालुकाध्यक्ष सागर कोळी, प्रसिद्धीप्रमुख गोकुळ कोळी, चंदन चौधरी, रावेर तालुकाध्यक्ष पंकज महाजन, नितीन महाजन, जामनेर तालुकाध्यक्ष सचिन चव्हाण, जामनेर शहराध्यक्ष ईश्वर चव्हाण, अंजू पवार,संतोष जोशी, सह संघटक अंकुश जोशी, युवा संघटक शेख इम्रान,संभाजी शिवाजी गंगावणे,मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष समाधान निकम, उपाध्यक्ष पंकज खिरोडकर, जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख सुरेश बाविस्कर, शशिकांत तायडे, चोपडा अध्यक्ष राम जाधव, प्रवीण चव्हाण, यावल तालुका सचिव हनीफ खान, प्रसिद्धीप्रमुख ललित कपले, कार्याध्यक्ष गणेश पाटील, रुपेश कोळी, महिला अध्यक्ष लक्ष्मीताई मेढे, चंद्रकांत तायडे यांच्यासह जिल्ह्यातील विविध पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जळगाव जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत तायडे यांनी केले, तर आभार यावल तालुका महिला अध्यक्ष लक्ष्मीताई मेढे यांनी मानले.

सामाजिक बांधिलकी जपण्याचा सामूहिक संकल्प

केवळ संघटनेचा विस्तार न करता समाजातील सर्वसामान्य नागरिकां च्या प्रश्नांना प्राधान्य देऊन प्रत्यक्ष मदतीसाठी पुढाकार घेण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला. जनहिताचे प्रश्न, सामाजिक न्याय आणि गरजूंच्या मदतीसाठी एकत्रितपणे काम करण्याचा संदेश देत बैठकीचा समारोप झाला.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे