सावदा परिसरात अवैध धंदे जुगार अड्डे जोमात, पोलीस प्रशासन कोमात..
या जुगार अड्यावाल्यांच्या मुसक्या आवळणारा पोलीस अधिकारी काही मिळेना ? परिसरातील जनतेकडून जुगार अड्डे बंद करण्याची मागणी.
(रावेर प्रतिनिधी – हमीद तडवी)
सावदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोचुर रोडवरील मंगल कार्यालय आणि हाजी अलि पेट्रोल पंपाच्या मागील बाजूस शेतात ताडपत्री, पिवळा फट बांधुन जुगार अड्डा राजरोस पणे सुरू आहे.ह्या जुगार अड्डयावर जुगारी जळगाव जिल्ह्यातुन येत असल्याची चर्चा आहे. हा जुगार अड्डया चालवणारे चालक मालक हे एकुण ४0 मालक असल्याचे समजले जात आहे.ह्या जुगार अड्डयावर दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याचे परिसरातील जनतेकडून बोलले जात आहे.
त्यातच सावदा शहर हे भारतातील सर्वात मोठे केळीचे व्यापारी व ट्रान्सपोर्ट म्हणून ओळखले जाते म्हणूनच सावदा शहराला बनाना सिटी म्हणून ओळखले जाते. या परिसरात मजुरांना देखील रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे .ह्या परिसरात मजूरच 1000 ते 1500 रुपये रोज कमवतो आणि या जुगार अड्डयावर जाऊन गमवतो यामुळे या जुगार अड्डयांमुळे अनेकांचे संसार उध्वस्त होतांना दिसत आहे. हा सगळा प्रकार सावदा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी यांना माहिती असल्यावरही डोळे लावून दुधावरची मलाई खात असल्याचे परिसरातील काही संघटनांचे अध्यक्ष, जेष्ठ नागरिक, महिलांसह परिसरातील जनतेकडून बोलले जात आहे आहे आणि ह्या जुगार अड्डयापासुन बरबाद उध्वस्त होत असलेल्या परिवारांना स्मशानभूमीत पोहचवल्यावरच पोलिस प्रशासनाला जाग येईल का? असा सवाल देखील उपस्थित झाला आहे.
आणखी किती दिवस चालणार हा जुगार अड्डा असेही परिसरातील जनतेकडून ऐकण्यास मिळत आहे. तेरी भी चुप और मेरी भी चुप अशी परिस्थिती असल्याकारणाने सावदा परिसरात जुगार अड्डे आणि अवैध धंदे बोकाळले आहे. या जुगार अड्ड्या वालेंकडुन काही तरी चिरीमिरी मिळत असल्याची परिसरातील जनतेमध्ये चर्चा जोर धरू लागली आहे. यामुळेच सुरू असतील हे जुगार अड्डे असेही परिसरातील जनतेकडून बोलले जात आहे.त्याचबरोबर हा लाखो ची उलाढाल करणारा जुगार अड्डा बंद करण्यात यावा आणि सर्व सामान्य जनतेचे जुगारामुळे होणारे जीवन वाचवावे अशी रास्त स्वरुपाची मागणी परिसरातील जनतेकडून जिल्हा वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचेकडे करण्यात आली आहे. पाहुया पोलिस प्रशासन जुगार अड्ड्यावाल्यांवर काय कारवाई करते? याकडे परिसरातील जनतेचे लक्ष लागून आहे.आणि बातमीची दखल घेतली जाते किंवा नाही? हा सवाल देखील परिसरातील जनतेला सतावत आहे…