अन्न व औषध प्रशासन विभागाची धडक मोहीम : 113 नमुने तपासणी साठी रवाना..

जळगाव – दिवाळी चे वेध नागरिकांना व्यवसायिकांना लागलेले असतात या काळामध्ये अनेक ठिकाणी अन्नामध्ये भेसळ करण्यात येते ही भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग तक्रारी आल्यानंतर किंवा स्वतःहून काही ठिकाणी नमुने जमा करीत असते असेच जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणाहून 113 नमुने घेण्यात आले असून ते नमुने तपासणी साठी लॅबमध्ये पाठवण्यात आले आहे. त्या नमुन्यांचा लॅबच्या अहवालाची प्रतीक्षा सुरू आहे अहवाल आल्यानंतरच संबंधीतांवर कारवाई करण्यात येईल असे अन्न व प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त कांबळे यांनी सागितले.
जळगाव जिल्ह्यामध्ये अन्न व प्रशासन विभागाने सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये म्हणजे दिवाळीच्या काळापूर्वी व दिवाळीच्या काळामध्ये अन्ना मध्ये भेसळ होऊ नये यासाठी जळगाव जिल्ह्यातील दूध, खवा, तूप, खाद्यतेल, ड्राय फूड मसाले, मिठाई व इतर अनेक पदार्थांची 113 नमुने घेण्यात आलेले आहे व हे सर्व नमुने प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहे
याबाबत अन्न व प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त यांनी सांगितले की आम्ही नमुने घेतलेले असून लॅबच्या अहवाल आल्यानंतर योग्य ती कडक कारवाई करण्यात येईल.
एकूण नमुने -(113)
दुध -14
खवा मावा 6
तूप 6
खाद्यतेल 19
ड्रायफुड 6
चॉकलेट -9
मिठाई 24
भगर 7
इतर. 22
ईतर महत्वाच्या बातम्या
3 हजाराची लाच : पोलीस हवलदार धुळे ACB च्या जाळ्यात..
4 हजाराची लाच : महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरणाचा उपविभागीय अधिकारी (वर्ग -1) एसीबी च्या ताब्यात.
मुक्ताईनगर ते वरणगाव रोडवरील 3 पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा टाकणारे दरोडेखोर गजाआड : LCB ची कारवाई..