शांतता समितीने महत्त्वाचे निर्णय घेणे आवश्यक..
यावल ( सुरेश पाटील )- सध्या यावल शहरात शहरात दादागिरी गुंडगिरी मुख्य रस्त्यांवरती बेकायदा अतिक्रमण,बेशिस्त वाहतूक आणि पार्किंग,गुन्हेगारी अवैधंदे यांच्यात झपाटयाने वाढ झाली आहे आणि होत आहे.यामुळे यावल शहरासह परिसराचा जातीय सलोखा कायदा व सुव्यवस्था व शांतता धोक्यात आली असून एखाद्या वेळेस फार मोठी प्रिय घटना घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे म्हणून याकडे शांतता समिती सदस्यांनी ठोस निर्णय घेऊन शांतता समिती सदस्यांनी संपूर्ण यावल शहराच्या हिताचा ठराव करून संबंधित अधिकाऱ्यांकडे पुढील कार्यवाहीसाठी द्यायला पाहिजे आणि असे न झाल्यास संपूर्ण यावलकरांना याचे विपरीत परिणाम भोगावे लागतील असे संपूर्ण यावल शहरासह तालुक्यात बोलले जात आहे.
यावल शहरात कुठे कुठे कोणत्या ठिकाणी कोणकोणते अवैध धंदे सर्रासपणे सुरू आहेत हे सर्वांना ज्ञात आहे या सर्व प्रकारच्या बेकायदा व्यवसायातून नशेखोरी,शाब्दिक चकमकी दमदाटी, हाणामारी,मारामाऱ्या छेडखानी ,खुलेआम होत असल्या तरी याकडे मात्र राजकीय क्षेत्रातील विरोधी आणि सत्ताधारी गटासह राजकीय,सामाजिक संघटनांचे ९५ टक्के दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सर्व स्तरातून लावला जात असून हे अवैध,आणि दोन नंबरचे व्यवसाय हे काही ठराविक राजकीय,नेतेमंडळी,पदाधिकारी यांच्या प्रभावाखाली,आणि हस्तशेपामुळे सुरू असल्याने पोलीस,महसूल आणि नगरपालिका विभागाला कारवाई करता येत नसल्याचे स्पष्ट झाले असल्याने यात आता फक्त यावल शहरातील शांतता समिती सदस्यच ठोस निर्णय घेऊन यावल शहरासह परिसराचा जातीय सलोखा व शांतता कायम राखणे कामे ठोस असा निर्णय घेऊन समितीच्या बैठकीत ठराव करून तो ठराव जिल्हाधिकारी जळगाव पोलीस अधीक्षक जळगाव यांच्यासह स्थानिक पोलीस,महसूल,नगरपरिषद प्रशासनाकडे पुढील कार्यवाहीसाठी द्यायला पाहिजे असे सुज्ञ समाजसेवक नागरिकांमध्ये बोलले जात आहे आणि असे न झाल्यास एखाद्या वेळेस फार मोठी अप्रिय घटना घडून यावल शहरातील परिसरातील सर्व जाती धर्मातील नागरिकांना याचे विपरीत परिणाम भोगावे लागतील एवढे मात्र निश्चित झाले आहे.
मनुष्यबळ कमी असल्याने यावल पोलिस काय काय करणार..?
यावल पोलीस स्टेशनला एकूण ६५ संख्याबळ मंजूर आहे मात्र यापैकी २४ पोलीस अंमलदार कमी असल्याने पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील अनेक गावांमधील बऱ्याच गुन्ह्यांचा तपास चौकशी करणे कामी तसेच दैनंदिन कामकाजात फक्त ३१ संख्याबळ असलेले पोलीस दररोज काय काय कामे करतील..? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून पर्यायी पोलिसांच्या कामकाजावर विपरीत परिणाम झाला आहे त्यांना त्यांच्या कार्यक्षमतेच्या बाहेर कामकाज करावे लागत असून मानसिक, शारीरिक ताण सहन करावा लागत आहे त्यामुळे आता कायदा व सुव्यवस्था,शांतता व जातीय सलोखा कायम राहणे कामी रावेर लोकसभा,विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधी,समाजसेवक,शांतता समिती सदस्यांनी आपले लक्ष केंद्रित करून शासन स्तरावरून यावल पोलिस मनुष्यबळ कसे वाढवता येईल यासाठी प्रयत्न करणे फार आवश्यक झाले आहे, किमान मंजूर संख्या बळ यावल पोलिसांना मिळाले तर पोलिसांवरील कामाचा बराच ताण कमी होईल असे सर्व स्तरातून बोलले जात आहे.