परळी शहरातील भीम नगर येथील विविध नागरी समस्या साठी 15 ऑगस्ट रोजी उपोषणास बसणार – बाळासाहेब जगतकर
निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन
परळी प्रतिनिधी – परळी शहरातील भीम नगर येथील विविध नागरी समस्या साठी 15 ऑगस्ट रोजी परळी नगरपालिकेसमोर उपोषणास बसणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्धीप्रमुख तथा तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष व साप्ताहिक मानपत्रचे संपादक बालासाहेब जगतकर यांनी दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की गेल्या पाच वर्षाखाली मोठा गाजावाजा करून बौद्धांची मते घेण्यासाठी बौद्धांचे श्रद्धास्थान असलेले बौद्ध धम्मकेंद्राची उभारणी करण्यात येईल अशी घोषणा करून आज पाच वर्षे झाले यात अनेक वेळा लेखी निवेदन देऊन प्रत्यक्ष भेटून व येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात सदरील धम्मकेंद्राचा निधी मंजूर करून घेण्यात यावा असे सांगूनही पावसाळी अधिवेशनात या धम्मकेंद्रासाठी छद्दाम ही मंजूर करण्यात आलेला नाही. तसेच भीम नगर येथील स्मशानभूमी राहिलेले अर्धवट कामे व लाईट व्यवस्था करण्यात यावी झाडे झुडपे तोडण्यात येऊन साफसफाई करण्यात यावी असे अनेक वेळा निवेदने व प्रत्यक्ष भेटूनही आतापर्यंत कुठल्याच प्रकारचे कामे झालेले नाहीत तसेच महिलांचे सार्वजनिक संडास ही थातूरमातूर दुरुस्त करून त्यामध्ये ना पाणी, ना लाईट अशा प्रकारे नगरपालिकेने काम केले आहेत तसेच परळी नगरपालिकेत कोट्यावधी रुपयाचा निधी पाणीपुरवठ्यासाठी आला असता गेल्या सहा महिन्यापासून परळी नगरपालिकेला निवेदन देऊनही साधा एक खड्डा ही बुजवण्यात आला नसून एक वाल ही बसवला नाही व शंकर साळवे यांचे घर ते सखाराम जगतकर यांच्या घरापर्यंत पाईपलाईन टाकून वाल टाकण्यात येऊन प्रबुद्ध नगर वासीयांचा पाण्याचा प्रश्न सोडवावा या भागातील नागरिकांना अधिकृत नळ कनेक्शन घेऊनही पाण्याचा थेंबही मिळत नाही असे लेखी निवेदन देऊन ही व प्रत्यक्ष भेटूनही कुठल्याच प्रकारची कामे न झाल्याच्या निषेधार्थ येत्या 14 ऑगस्ट 2024 पर्यंत सर्व कामे करण्यात यावेत अन्यथा 15 ऑगस्ट 2024 रोजी म्हणजेच स्वतंत्र्य दिनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परळी शहरातील नगरपालिके समोर अमरण उपोषणास बसणार असल्याची माहितीही देण्यात आली असून तसे देखील निवेदन ही माननीय जिल्हाधिकारी साहेब जिल्हा कार्यालय बीड यांना लेखी निवेदन दिले असून यावेळी वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्ध प्रमुख पश्चिम प्रा.बालाजी जगतकर ऍड.डी. आर. गोरे वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा सहसचिव पुरुषोत्तम वीर, वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पूर्व बालासाहेब जगतकर वंचित बहुजन युवा आघाडीचे परळी तालुकाध्यक्ष राजेश सरवदे वंचित बहुजन युवा आघाडीचे परळी तालुका महासचिव ज्ञानेश्वर गीते वंचित बहुजन युवा आघाडीचे परळी तालुका उपाध्यक्ष संतोष व्हावळे उपस्थित होते अशी माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.