यावल पं.स. माजी गटनेते शेखर पाटील यांना दहीगाव शिवारात बिबट्याचे दर्शन..
यावल दि.२४ (सुरेश पाटील) – यावल तालुक्यातील दहिगाव शिवारात यावल पंचायत समितीचे गटनेते शेखर सोपान पाटील यांना बिबट्याने दर्शन दिले असता त्यांनी तात्काळ यावल पश्चिम वनक्षेत्रपाल यांना कळवून पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.जामुनझीरा,सावखेडासिम मोहराळा शिवारात बिबट्याने दहशत पसरवली नागरिक, शेतकरी,शेतमजूर हैराण झाले आहेत आता नुकताच दहिगाव पासून २ किलोमीटर अंतरावर असलेल्या दहिगाव शिवारात रविवार दि.२३ रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास बिबट्या दिसल्याने त्याचे छायाचित्र माजी पंचायत समिती सदस्य तथा काँग्रेसचे गटनेते शेखर सोपान पाटील यांनी आपल्या मोबाईल मध्ये तात्काळ काढले व याबाबत त्यांनी तत्काळ यावल वन विभाग जळगाव कार्यक्षेत्रातील यावल येथील पश्चिम वन विभागाला माहिती दिली
दि.२३ रोजी रात्री ७ वाजता स्कुटी घेऊन शेखर पाटील यांचे शेतात जात असताना त्यांना दहिगाव शिवारात बाबुराव नामदेव महाजन यांचे शेताजवळ भर रस्त्यात स्कुटीच्या लाईटाने बिबट्या असता त्यांनी तात्काळ समयसूचकता बाळगून लांब अंतरावरून मोबाईल झूम करून बिबट्याचे छायाचित्र काढले आणि तत्काळ यावल पश्चिम वनक्षेत्रपाल यांना याबाबतची माहिती दिली.रात्रपाळी करणाऱ्या शेतकरी शेतमजूर नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणातभीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतात बागायती पिकांना पाणी भरायचे किंवा नाही याबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठी धास्ती निर्माण झाली आहे. सध्या मका काढणे भुईमूग काढणे अशी शेतीची जोरदार कामे सुरू आहे. कांदा काढण्यासाठी मजूर शेतात जायला नकार देत आहेत त्यामुळे शेतकरी वर्ग हैराण झाला आहे. परिणामी शेतकऱ्यांना स्वतः शेताकडे आपला जीव धोक्यात टाकून जावे लागत आहे या गंभीर बाबीकडे वनविभागाने दुर्लक्ष न करता तत्काळ उपाय योजना करून बिबट्याला जेरबंद करावे अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.दि.२२ ते रात्री मोहराळा शिवारात स्मशानभूमी जवळ बिबट्या दिसला होता.तत्पूर्वी जामुनझीरा शिवारातील नदी जवळ पंकज महाजन यांचे शेताच्या बांधावर बिबट्या दिसल्याने शेतकरी भीतीने ते घरी परतले त्यामुळे यावल पश्चिम क्षेत्रपाल यांनी तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी सर्व स्तरातून मागणी आहे.