चाळीसगाव
चाळीसगाव मतदार संघातून आमदार मंगेश चव्हाण यांचा दणदणीत विजय..
चाळीसगाव – भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार मंगेश चव्हाण हे चाळीसगाव विधानसभा मतदार संघात ८६ हजार मताधिक्याने विजयी होऊन मतदारसंघात आपल्या नावावर मतांचा विक्रम नोंदवला. सर्वाधिक मते घेऊन विजय संपादन करणारे मंगेश चव्हाण हे तालुक्याचे पहिले आमदार ठरले.
एक सामान्य कुटूंबातील कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना देशातील सर्वात मोठा पक्षांची उमेदवारी मिळविणे आणि लोकांतून निवडून येणे म्हणजे तारेवरची कसरत. आरोप प्रत्यारोप झेलत अतिशय खेळाडू वृत्तीने चव्हाण यांनी ही बाजी मारली.
महाविकास आघाडीचे उमेदवार उन्मेष पाटील यांचा पराभव करत आमदार मंगेश चव्हाण यांनी दणदणीत विजय मिळवला.