४० हजाराची लाच : तामसवाडीचा ग्रामविकास अधिकारी धुळे ACB च्या जाळ्यात..

पारोळा – तामसवाडी, येथील ग्राम विकास अधिकाऱ्यास ४० हजारांची लाच घेतांना धुळे लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले असून दिनेश वासुदेव साळुंखे ग्राम विकास अधिकाऱ्याचे नाव असून सदर ग्रामविकास अधिकाऱ्यास लाच घेतांना पकडल्याने लाच खोरांच्या गोठ्यात एकच खडबळ उडाली आहे.
यातील तक्रारदार हे शासकीय बांधकाम ठेकेदार असून त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या दलित वस्ती सुधार अंतर्गत मोजे तामसवाडी ग्रामपंचायतचे रस्ता कॉंक्रिटीकरणाचे पाच लक्ष किमतीचे काम घेऊन पूर्ण केले होते. सदर झालेल्या कामाचे चार लाखाचे बिलाचा चेक दिनेश वासुदेव साळुंखे ग्रामपंचायत अधिकारी, तामसवाडी यांनी तक्रारदार यांना अदा करून सदरची रक्कम तक्रारदार यांच्या बँक खात्यात जमा झाली होती त्यानंतर तक्रारदार व त्यांचे चुलत काका असे तक्रारदार यांनी घेतलेल्या दुसऱ्या कामाची चौकशी करण्याकरिता सुमारे 07 दिवसांपूर्वी तामसवाडी ग्रामपंचायत कार्यालयात गेले असता तेथे दिनेश वासुदेव साळुंखे ग्रामपंचायत अधिकारी, तामसवाडी यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांना अदा केलेल्या बिलाच्या रकमेच्या 10 टक्के प्रमाणे 40,000/- रुपये लाचेची मागणी केल्याने तक्रारदार यांनी दूरध्वनी द्वारे माहिती दिली होती.
सदर माहितीवरून ला.प्र.वि. धुळे पथकाने पारोळा येथे जाऊन तक्रारदार यांची भेट घेऊन त्यांची तक्रार नोंदवून घेतली होती. सदर तक्रारीची दि. 19.05.2025 रोजी पडताळणी केली असता दिनेश वासुदेव साळुंखे ग्रामपंचायत अधिकारी, तामसवाडी यांनी तक्रारदार यांच्याकडे 40,000/- रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम अंमळनेर येथे दगडी दरवाजा समोर राजे संभाजी चौकात स्वतः स्वीकारून दुचाकी वर पळून गेले होते. त्यानंतर त्यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांचे विरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कारवाई
धुळे ला.प्र.विभागाचे पोलीस उपअधीक्षक,सचिन साळुंखे,पोलीस निरीक्षक,रूपाली रा.खांडवी, पो.हवा. राजन कदम, पो. कॉ. प्रशांत बागुल यांनी केली