यावल

यावल पूर्व व पश्चिम वनक्षेत्राच्या हद्दीतून दररोज मोठ्या प्रमाणात लाकडाची वाहतूक..

यावल उपवनसंरक्षक विभागाचे दुर्लक्ष.

यावल ( सुरेश पाटील ) – यावल वन विभाग कार्यक्षेत्रातील यावल येथील यावल पूर्व व पश्चिम वनक्षेत्रपाल यांच्या कार्यालयापासून एक किलोमीटर अंतरावरून दररोज सागवान व आडजात लाकडाचे ट्रक भरून ताडपत्रीने झाकून परराज्यात व जिल्ह्यात रवाना होत असतात याकडे उपवनसंरक्षक यांनी लक्ष केंद्रित करून कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

यावल पूर्व व पश्चिम वनक्षेत्रपाल यांचे कार्यक्षेत्रातून म्हणजे सातपुडा जंगलातून सागवान व आडजात लाकडाची वृक्षतोड सर्रासपणे होत असून बेकायदा वाहतूक ट्रक व लहान चार चाकी वाहनातून सर्रासपणे सुरू आहे. ही ही सागवानी लाकडाची अवैध बेकायदा वाहतूक करताना संबंधित वाहनात लाकूड भरून नेताना वरतून ताडपत्रीने झाकून अवैध लाकडाची वाहतूक करतात ही वाहतूक करताना ठिकठिकाणीच्या वजन काट्यावर वाहनासह लाकडाचे वजन वजन करून पर राज्यात व जिल्ह्यात दिवसा आणि रात्री बिंदासपणे सुरू आहे.

एक ट्रक भरून आडजात लाकूड वाहतुक करण्यासाठी दर निश्चित करण्यात आले आहेत.यात एका ट्रक साठी रेंजरच्या नावाने,नाके कारकुन आणि फिरते पथकाच्या नावाने काही रक्कम दयावी लागते ? व इतर दुसरा खर्च धरून एक ट्रक भरून वाहतूक करण्याचा खर्च.आणि हा ट्रक भर लाकूड बाजारात परराज्यात मोठ्या किमतीत विक्री होत असतो म्हणजे एका ट्रक मध्ये दुप्पट नफा मिळतो अशी चर्चा यावल रावेर तालुक्यात आहे. याकडे जळगाव येथील यावल वन विभाग उपवनसंरक्षक यांनी आपले लक्ष केंद्रित करून कारवाई करावी अशी मागणी होत आहे..

या बाबत यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्या कडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे