ब्रेकिंग

Dryday च्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाची बनावट दारू वाहतुकीवर धडक कारवाई..

इनोव्हा क्रिस्टासह ११.४५ लाखांचा मुद्देमाल जप्त : चौघे ताब्यात.

जळगाव : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर १५ ऑगस्ट रोजी असलेल्या ‘ड्राय डे’च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने बनावट दारू वाहतुकीविरोधात धडक कारवाई केली. पाचोरा तालुक्यातील वरखेडी शिवारातील गुरांच्या बाजाराजवळ सापळा रचून बनावट देशी दारूची वाहतूक करणाऱ्या इनोव्हा क्रिस्टा वाहनासह तब्बल ११ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक, जळगावला १४ ऑगस्ट रोजी गोपनीय बातमीदारामार्फत वरखेडी शिवारात बनावट देशी दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने पाचोरा रोडवरील गुरांच्या बाजाराजवळ सापळा रचला.यावेळी पांढऱ्या रंगाची टोयोटा इनोव्हा क्रिस्टा (एमएच-११-सीएच-१७०९) संशयास्पदरीत्या येताना दिसताच पथकाने वाहन अडवून तपासणी केली. वाहनातील व्यक्तींनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने वाहनाची झडती घेण्यात आली. झडतीदरम्यान ९० मिली क्षमतेच्या टॅगो ब्रँडच्या बनावट देशी दारूचे २५ बॉक्स आढळून आले.

या कारवाईत बनावट देशी मद्यासह इनोव्हा क्रिस्टा कार आणि चार मोबाईल संच असा एकूण ११.४५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.याप्रकरणी आरीफ राजू तडवी (वय २९, रा. लोहारी बु., ता. पाचोरा), अनिल खंडू भोई (वय ५१, रा. वरखेडी, ता. पाचोरा), मुकेश सुभाष कोळी (वय ३०, रा. पिंप्राळा, जळगाव) आणि अनिल शिवराम महाजन (वय ४४, रा. हरी विठ्ठल नगर, जळगाव) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

या प्रकरणी गुन्हा क्रमांक २७८/२०२६, दिनांक १४ ऑगस्ट २०२६ अन्वये कारवाई करण्यात आली असून पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे निरीक्षक अशोक प्र. तारू करीत आहेत. ही कारवाई जळगावचे अधीक्षक प्रदीप पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली. अशोक प्र. तारु निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, यांच्या भरारी पथकाने केली.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे