यावल पंचायत समितीत घेण्यात आलेल्या पाणीटंचाईच्या आढावा बैठकीत दोघ आमदारांनी बीडीओंना धरले धारेवर..

यावल ( प्रातिनिधी ) :यावल पंचायत समितीत सोमवारी घेण्यात आलेल्या पाणीटंचाईच्या आढावा बैठकीत दोघ आमदार पंचायत समिती प्रशासनाच्या कारभारावर चांगलेचं संतापले. बैठकीत केवळ ऑफीस मध्ये बसुन अहवाल तयार करून तो सादर करून चालणार नाही, गावा गावात जावुन या दुष्काळ परिस्थिती आढवा घ्या अशा शब्दात कानउघडणी करण्यात आली तर दुष्काळ परिस्थितीसाठी च्या या बैठकीत दोन ग्रामसेवक गैरहजर होते तेव्हा गटविकास अधिकारी यांना देखील खडेबोल सुनावले व त्यांच्यावर कारवाईच्या सुचना केल्या तर गेल्या आढावा बैठकी प्रमाणे या बैठकीत देखील आमदार खासदार यांच्या उपस्थित बैठकी झाल्यात मात्र कोणते ही विषय मार्गी लागले नसल्याची देखील संत्पत प्रतिक्रिया महायुतीचे पदधिकारी व नागरीकांमध्ये व्यक्त करण्यात आल्यात,
यावल येथील पंचायत समितीच्या सभागृहामध्ये तालुक्यातील पाणी टंचाई संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत रावेर यावल मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे,चोपडा आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांची उपस्थिती होती. दरम्यान आढावा घेतला मात्र, यात तालुक्यात झालेल्या पावसाची टक्केवारी ७९ टक्के सांगण्यात आली तर आमदारांना सादर केलेल्या पत्रात पावसाची टक्केवारी वेगळीच होती तसेच तुर्त तालुक्यात कुठेच पाणीटंचाई नसल्याचे पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता राजेंद्र गिरी यांनी सांगीतले. तर याच दरम्यान बैठकीत उपस्थित ग्रामसेवकांना शिरसाड, हंबर्डी आणि दहिगाव या गावात याच वर्षी पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता त्यांनी वर्तवली तेव्हा सादर केलेला आढावा व येथे उपस्थित ग्रामसेवक देत असलेली माहिती यात विसंगती दिसत असल्याने दोन्ही आमदार चांगलेचं संतापले व त्यांनी गटविकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड यांना खडेबोल सुनावले, तसेच सर्व ग्रामसेवक आले आहेत का? असे विचारले असता दोन ग्रामसेवक गैरहजर असल्याचे दिसुन आले तेव्हा बीडीओ म्हणुन तुमचा प्रशासनावर वचक नाही का?, असे देखील आमदारांनी बिडीओ डॉ. गायकवाड यांना सुनावले तर अनुपस्थित ग्राम सेवकांवर कारवाई केली जाईल असे यावल गटविकास अधिकारी श्रीमती मंजुश्री गायकवाड यांनी सांगितले या बैठकीमध्ये तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार, यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उप सभापती तथा संचालाक बबलू जनार्दन कोळी, माजी सभापती नारायण चौधरी, सूर्यभान पाटील,भाजपा तालुकाध्यक्ष सागर कोळी, यावल नगरपालिकेच्या भाजपा गटनेता नंदाताई महाजन, भरत चौधरी सह ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी व विविध गावाचे सरपंच, सदस्य, प्रशासक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर सपकाळे यांनी केले होते.