यावल

आमदार अमोल जावळे यांच्या प्रयत्नाने फैजपूर नगर परिषदेला सार्वजनिक शौचालये व मुतारींसाठी १.५३ कोटींचा निधी मंजूर..

मंजूर प्रस्तावात ८० शौचालये व ४४ मुतारींचा समावेश : वाढीव १०६ शौचालये व ४८ मुतारींसाठी स्वतंत्र प्रस्ताव सादर

यावला ( प्रतिनिधी ) तालुक्यातील फैजपूर शहरातील सार्वजनिक स्वच्छता सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आमदार अमोल जावळे यांच्या प्रयत्नातून फैजपूर नगर परिषदेला स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) SBM 2.0 अंतर्गत सार्वजनिक शौचालये व मुतारींच्या उभारणीसाठी सुमारे १ कोटी ५३ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0 अंतर्गत फैजपूर नगर परिषदेने सार्वजनिक शौचालये व मुतारींच्या उभारणीसाठी प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाची छाननी केल्यानंतर राज्य अभियान संचालनालयाने त्यास मान्यता दिली असून, यासंदर्भातील अधिकृत पत्र नगर परिषदेला प्राप्त झाले आहे.

मंजूर प्रस्तावानुसार ८० शौचालय सीट्स आणि ४४ मुतारी सीट्स, अशा एकूण १२४ सीट्सच्या सुविधांचा समावेश आहे. यासाठी सुमारे १.५३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची उपलब्धता वाढण्यास मदत होणार आहे.

दरम्यान, शहरातील वाढती गरज आणि नागरिकांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने वाढीव स्वरूपात १०६ शौचालय सीट्स आणि ४८ मुतारी सीट्स, अशा एकूण १५४ सीट्सच्या सुविधांसाठी स्वतंत्र प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या वाढीव प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर सार्वजनिक स्वच्छता सुविधांमध्ये आणखी वाढ होण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्र शासन, राज्य शासन आणि नगर परिषदेच्या आर्थिक हिश्श्याची तरतूद करण्यात आली आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या सुविधांमुळे नागरिकांची सोय होण्याबरोबरच शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्यास मदत मिळणार आहे.

आमदार अमोल जावळे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेला निधी आणि वाढीव सुविधांसाठी सादर करण्यात आलेला प्रस्ताव यामुळे फैजपूर शहराच्या सार्वजनिक स्वच्छता व्यवस्थेला चालना मिळणार आहे. नागरिकांना अधिक चांगल्या नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे