यावल कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयात ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत स्वयंसेवकांनी घेतली शपथ..

यावल (प्रतिनिधी ) जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, यावल येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत प्राचार्य डॉ. एस. आर. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ‘नशामुक्त भारत अभियान’ उत्साहात राबविण्यात आले. या अभियानांतर्गत महाविद्यालया च्या आवारात उपस्थित स्वयंसेवकांनी नशामुक्त भारतासाठी शपथ घेतली.

या प्रसंगी सी. टी. वसावे यांनी उपस्थित स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले आणि व्यसनमुक्त जीवन जगण्याचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी व युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमाला कार्यक्रम अधिकारी डॉ.पी. व्ही.पावरा, प्रा.अर्जुन गाढे, प्रा. नागेश्वर जगताप आणि प्रा. हेमंत पाटील, प्राध्यापिका रुपाली शिरसाठ हे उपस्थित होते. या विशेष कार्यक्रमात एकूण 97 स्वयंसेवक उपस्थित राहून अभियानाचे महत्त्व समजून घेतले