साकळी येथे NH ७५३-बी ई महामार्गाच्या भूमी अधिग्रहणासाठी संयुक्त मोजणीला अखेर झाली सुरुवात : शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती..

यावल ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील साकळी राष्ट्रीय महामार्ग NH ७५३-बीई (NH 753BE) च्या रुंदीकरणासाठी आणि भूमी अधिग्रहणा च्या कामांना आता साकळी परिसरात वेग आला आहे. आज सकाळी भूमी अभिलेख विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) यांच्या संयुक्त पथकाद्वारे साकळी शिवारात जमिनीची मोजणी अधिकृतपणे सुरू करण्यात आली. या वेळी बाधित होणारे सर्व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जळगाववरून सकाळीच मोजणी पथकाचे वरिष्ठ अधिकारी विनोद सूर्यवंशी आणि टीम साकळी परिसरातील दाखल झाले तसेच साकळीचे सरपंच दिपक पाटील, शेतकरी योगेश खेवलकर,जगदीश पाटील, किरण माळी, योगेश महाजन, योगेश खेवलकर उपस्तित होते त्यानंतर शेतकरी बांधव आणि अधिकाऱ्यां मध्ये योग्य समन्वय साधून प्रत्यक्ष जमिनीची मोजणी आणि हद्द निश्चितीच्या कामाला सुरुवात करण्यात आली.या महामार्गामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या जात असल्याने, मोजणीच्या वेळी कोणताही वाद होऊ नये आणि पारदर्शकता राहावी यासाठी शेतकऱ्यांनी स्वतः उपस्थित राहून आपल्या सातबारा व नकाशांनुसार हद्द दाखवून दिली. प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करत मोजणी प्रक्रिया शांततेत सुरू ठेवली आहे. या मोजणीनंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया आणि नुकसान भरपाईचा मार्ग मोकळा होणार आहे.