ACB च्या जाळ्यात अडकलेल्या उपनिबंधकाच्या बँक लॉकरमधून १.०७ कोटींचा सोन – चांदी व रोख रक्कम जप्त..

जळगाव – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 3 लाख लाचेच्या कारवाईत अटक केलेले उपनिबंधक सहकारी संस्था, जळगाव येथील लोकसेवक जगदीश बाबुराव बारी यांच्या लॉकरमधून तब्बल १ कोटी ७ लाख ४४ हजार ७५ रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज व रोख रक्कम जप्त करण्यात आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
दि. २० मे २०२६ रोजी ACB ने जगदीश बारी यांच्याविरोधात लाच प्रकरणी कारवाई केली होती. त्यानंतर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता . दरम्यान, घरझडती दरम्यान आरोपी जगदीश बारी यांचे कॉसमॉस बँक, भुसावळ येथे लॉकर असल्याची माहिती ACB ला मिळाली. त्यानुसार लॉकरची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने, सोन्याचे बिस्किट तसेच रोख रक्कम आढळून आली.
जप्त मुद्देमाल
६६०.३३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे हार, बांगड्या व सोन्याचे बिस्किट — किंमत ९९,०४,९६० रुपये
५०० रुपयांच्या नोटांमध्ये रोख रक्कम — ८,३६,५०० रुपये
१०.५०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने — किंमत २,६२५ रुपये
असा एकूण १,०७,४४,०७५ रुपयांचा मौल्यवान मुद्देमाल ACB पथकाने जप्त केला आहे.
या कारवाईत पोलीस उप अधीक्षक योगेश ठाकूर, पोलिस निरीक्षक स्मिता नवघरे यांच्यासह पोउनि सुरेश पाटील, महिला पोलीस हवालदार संगिता पवार, पोलीस अंमलदार प्रदीप पोळ, मनोज पाटील, अमोल सुर्यवंशी आणि चंद्रशेखर चौधरी यांनी सहभाग घेतला.
या कारवाईमुळे सहकार विभागात मोठी खळबळ उडाली असून ACB च्या पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ईतर महत्वाच्या बातम्या
१.५० लाखाची लाच : उपनिबंधकासह खासगी पंटर ACB च्या जाळ्यात..
बोदवड खून प्रकरणी गंभीर निष्काळजीपणा : API सह 2 पोलीस निलंबीत..
निमखेडी रोडवरील अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश..