गुन्हेगारीचोपडा

५ हजारांची लाच घेतांना तलाठी अटकेत : जळगाव ACB ची कारवाई

चोपडा – विटनेर येथील तलाठयास  ५ हजारांची लाच स्वीकारताना  एसीबी च्या पथकाने रंगेहाथ पकडले. असुन रविंद्र काशिनाथ पाटील,तलाठी असे त्यांचे नाव आहे .या कारवाईने लाचखोरांच्या गोठ्यात मोठी खळबळ उडाली आहे.

यातील तक्रारदार यांचे सासऱ्याचे नावाने पंतप्रधान आवास योजना अंतर्गत घरकूल मंजुर झालेले होते. घरकूल बांधण्यासाठी रेतीची आवश्यकता असल्याने यातील तलाठी रविंद्र पाटील यांनी तक्रारदार यांचे कडे वाळू ट्रक्टरचे वाहतूकीसाठी १००००/- रुपये लाचेची मागणी केली होती. त्याबाबत तक्रारदार यांनी दि.२७ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगांव येथे तक्रार दिली होती. सदर तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारी प्रमाणे पंचा समक्ष दि.28 रोजी पडताळणी केली असता तलाठी रविंद्र पाटील, यांनी पंचा समक्ष १००००/- रु. लाचेची मागणी केली. त्यानंतर तलाठी रविंद्र पाटील,यांना ५००० रु.ची लाच घेताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले . त्यांचेवर चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन जि.जळगांव येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केला सापळा यशस्वी

हा सापळा जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, बाळू मराठे, प्रणेश ठाकूर ,तसेच पोलीस निरीक्षक एन.एन. जाधव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, हवालदार सुरेश पाटील, रवींद्र घुगे, महिला हवालदार शैला धनगर, किशोर महाजन, सुनील वानखेडे, प्रदीप पोळ, राकेश दुसाने, अमोल सूर्यवंशी, सचिन चाटे आदींच्या पथकाने यशस्वी केला.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे