जळगाव

TDS प्रकरणी इन्कम टॅक्स पथकाची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासणी..

जळगाव– शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील चिंचोली मेडिकल हब मध्ये शासनाने दिलेल्या बाराशे कोटी वरील टीडीएस बाबत  इन्कम टॅक्स पथक शासकीय महाविद्यालयात दाखल झाले होते उशिरापर्यंत त्यांची तपासणी सुरू होती. शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता म्हणाले की ही रुटींग तपासणी आहे

शासनाने जळगाव तालुक्यातील चिंचोली येथे मेडिकल हब निर्माण करण्यासाठी 1200 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे या मध्ये टीडीएस न कपातीच्या संशयाने सुमोटो ने इन्कम टॅक्स चे पथक 21 जानेवारीला सकाळी दहा वाजेपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी संपूर्ण विभागातील कागदपत्रांची तपासणी करीत आहे यामध्ये आयुर्वेदिक होमिओपॅथिक सर्व विभागांची तपासणी व कागदपत्र ही तपासणी करण्यात येत आहे या पथकामध्ये कमिशनर असिस्टंट कमिशनर व इतर कर्मचारी असे सात ते आठ जणांचे पथक आलेले असून त्याबरोबर पोलीस पथकेही  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सकाळपासून ठाण मांडून बसलेले आहे . टीडीएस मध्ये कोणत्या वस्तूंसाठी दहा टक्के कुठे दोन टक्के असे टीडीएसची कपात करण्यात येते त्यानुसार सर्व कागदपत्र व सर्व विभागांचे लेखाजोखा तपासण्यात येत आहेत

याबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर गिरीश ठाकुर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की एच एस सी सी व डीएमईआर वैद्यकीय शिक्षण संशोधन विभाग यांच्यामध्ये करार झालेला आहे यामध्ये झालेल्या करारानुसार जो पेमेंट केला जातो त्यामध्ये टीडीएस कपात झालेला आहे की नाही मग तो योग्य प्रमाणात झालेला आहे की नाही याची तपासणीसाठी हे पथक आलेले आहे

त्यांना चिंचोली मेडिकल हब बाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की संपूर्ण विभागाच्या चौकशी करण्यात येत आहे तिथे ठेकेदार वगैरे यांचा काही एक संबंध नाही शासनाकडून जो पैसा दिलेला आहे किंवा जो पेमेंट करण्यात येतो त्यासाठी टीडीएस भरला आहे की नाही याची तपासणी करण्यात येत आहे

ईतर महत्वाच्या बातम्या

1 हजाराची लाच ZP शाळेचा मुख्यध्यापक ACB च्या जाळ्यात.. 

जळगावात तरुणाचा निर्घृण खून : ७ जण गंभीर जखमी..

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे